आज किंग्ज ११ पंजाबने आयपील २०१८साठी आपल्या कर्णधाराची निवड केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातुन आज यासाठी विरेंद्र सेहवागने आर अश्विनच्या नावाची घोषणा केली.
“आम्हाला कर्णधार म्हणून एक वेगळा खेळाडू हवा होता. मला कर्णधार म्हणून एक गोलंदाज हवा होता. कपिल देव, वसीम अक्रम आणि वकार युनीस यांनी कर्णधार या नात्याने मोठी कामगिरी केली आहे. मी त्यांचा चाहता होतो. त्यामुळे अश्विनही अशीच कामगिरी किंग्ज ११ पंजाबसाठी करेल असा विश्वास आहे. ” असे विरेंद्र सेहवाग अश्विनच्या निवडीवर म्हणाला.
“माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी आभारी आहे. विरु पा (विरेंद्र सेहवाग) च्या विश्वास दाखवण्यामुळेच माझी कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मी माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.” असे अश्विन यावेळी म्हणाला.
We have a new #KingOfTheNorth! Sheron, give a big welcome to the Protector of the Realm! Our new captain, @ashwinravi99! #LivePunjabiPlayPunjabi pic.twitter.com/pKyHeTvCls
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 26, 2018
Congratulations @ashwinravi99 paji. Wish you all the best as captain of @lionsdenkxip!
— Barinder Sran (@sranbarinder) February 26, 2018
@ashwinravi99 @prithinarayanan I hear a very good news.Look forward seeing a new leader in IPL with fresh thoughts and ideas..Exciting times..Well done Ashwin !
— Gautam Bhattacharya (@gbsaltlake) February 26, 2018