जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात निवडक खेळाडूला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. आता फेब्रुवारी या महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आर अश्विन याला मिळाला आहे.
अश्विनने फेब्रुवारी महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत लक्षणीय कामगिरी केली होती. ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिले ३ सामने फेब्रुवारी महिन्यात झाले होते. या तिन्ही सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना अश्विनने एकूण २४ विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबरच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झुंजार शतकही झळकावले होते. त्याच्या याच कामगिरीला पाहता आयसीसीने त्याला प्लेअर ऑफ द मंथ निवडले आहे.
24 wickets in February 📈
A match-defining hundred vs England 💥
ICC Men's Player of the Month ✅Congratulations, @ashwinravi99! pic.twitter.com/FXFYyzirzK
— ICC (@ICC) March 9, 2021
अशा पद्धतीने दिले जातील पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कोरोना चाचणी करतेवेळी सचिन तेंडूलकरला ‘हे’ काय झालं, डॉक्टरही गेले घाबरुन
वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल
पक्काचं समजा! टी२० मालिकेत भारताचा विजय जवळपास निश्चित, असं आम्ही नाही ही आकडेवारी सांगते