---Advertisement---

जय शाहांची काही चूक नाही? शिवरामकृष्णन यांच्या नव्या वक्तव्यामुळे गोंधळ, अश्विननेही दिली प्रतिक्रिया

On: शनिवार, मार्च 21, 2026 4:59 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे चाहते आणि तज्ञ दोघांचेही लक्ष वेधले गेले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) समालोचन कारकिर्दीतून निवृत्ती घेतली. त्यांनी निवृत्ती घेतली ही काही साधी बाब नसून त्यामध्ये त्यांनी लावलेल्या आरोपांमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले आहे. त्यांच्या या निवृत्तीमागे आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांचा हात नाही, हे पण त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवरामकृष्णन यांनी असा दावा केला की, त्यांना अनेक काळापासून वंशभेदाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते महत्वाच्या संधींपासून वंचित राहिले. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून त्यांचा हा निर्णय सांगितला आहे.

शिवरामकृष्णन यांनी त्यामध्ये लिहिले, “जर गेल्या २३ वर्षांत ‘टॉस’ आणि ‘प्रेझेंटेशन’साठी माझा वापर केला गेला नसेल, आणि अगदी रवी शास्त्री प्रशिक्षक असतानाही, नवीन आलेल्या व्यक्तीचा ‘पिच रिपोर्ट’, ‘टॉस’ आणि ‘प्रेझेंटेशन’ची जबाबदारी सांभाळत असतील, तर यामागे काय कारण असू शकेल असे तुम्हाला वाटते?”

शिवरामकृष्णन यांच्या या पोस्टवर एकाने त्यांचा रंग यामागील कारण आहे का? असे विचारले असता त्यांनी होकार दिला. त्यांच्या या वक्तव्यांनंतर एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली.

आपल्या निवेदनात शिवरामकृष्णन यांनी म्हटले अनुभव आणि ज्ञान असूनही नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक दशकांचा अनुभव असूनही मला का बाजूला केले गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी यामध्ये संपूर्ण बीसीसीआयचा सहभाग नाही, तर एका कर्मचाऱ्यामुळे झाले असल्याचे पोस्ट केले आहे.

“बीसीसीआय प्रशासनाला यात ओढू नका. ही बीसीसीआयच्या एका कर्मचाऱ्याशी असलेली थेट, वैयक्तिक बाब आहे. जय शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी माझ्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेत आहे आणि मला तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे शिवरामकृष्णन यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवरामकृष्णन यांच्या निवृत्तीच्या पोस्टला भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले, “या आयपीएल मध्ये का नाही?”

शिवरामकृष्णन १९८०च्या दशकामध्ये भारतीय संघात होते. लेग स्पिनर म्हणून त्यांनी १९८३ ते १९८७ मध्ये कसोटी आणि वनडेमध्ये एकूण २५ सामने खेळले आहेत. त्यांनी १९८४मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विजेत्या कसोटी सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---