---Advertisement---

“मला ‘ब्लँक कॉल्स’ खूप येत होते…” आर अश्विनच्या पत्नीचा मोठा खुलासा

On: बुधवार, जून 18, 2025 8:13 PM
---Advertisement---

R Ashwin Documentary: आर. अश्विन आणि त्याची पत्नी प्रीती नारायणन यांची प्रेमकहाणी आणि क्रिकेट प्रवास आता एक डॉक्युमेंट्रीद्वारे समोर येत आहे. प्रीतीने सांगितले की, अश्विन त्यांच्या घरी लँडलाइनवर ब्लँक कॉल करायचा आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. (Ashwin love story with Preethi Narayanan)

प्रीतीने ही गोष्ट त्या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितली आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनवर आधारित आहे. यामध्ये अश्विनचे वडीलही अनेक गोष्टी सांगताना दिसतात. त्यांनी सांगितले की, एकदा अश्विनच्या पायात हालचालच होत नव्हती, नीट चालूही शकत नव्हता. तेव्हा वाटलं की मुलाचं क्रिकेटचं स्वप्न कदाचित अपूर्ण राहील.

मात्र अश्विनच्या आईने त्यावेळी महत्त्वाचा सल्ला दिला, “तो वेगवान गोलंदाज न राहता स्पिनर का बनू नये?” आणि त्याच क्षणापासून अश्विनने स्पिन गोलंदाजी सुरु केली. पुढे त्याने केवळ आपल्या कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्वल केलं.

चेन्नई सुपर किंग्सने ‘डॉक्युमेंट्री सीरिज’ अंतर्गत आर अश्विनच्या जीवनावर आधारित व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. पूर्ण डॉक्युमेंट्री (19 जून) रोजी रिलीज होणार आहे. मात्र त्याआधी CSK ने छोटासा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये प्रीतीने त्यांची लव्ह स्टोरी शेअर केली आहे.

अश्विन आणि प्रीती यांची ओळख शालेय काळापासूनची आहे. दोघं मित्र होते, पण ही मैत्री सुरू कशी झाली? त्याबद्दल प्रीतीने सांगितले की, अश्विन तिला घरी लँडलाइनवर ब्लँक कॉल करायचा. (Ashwin love story with Preethi Narayanan)

आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर अश्विनने चेन्नई सुपर किंग्ससाठी 8 हंगाम खेळले. त्यानंतर त्यांनी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येकी 2 सीझन खेळले. आयपीएल 2025 मध्ये सीएसके सोबत पुन्हा जोडण्यापूर्वी, अश्विनने 3 वर्षे राजस्थान रॉयल्ससाठीही खेळ केले. (Ashwin’s IPL journey)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---