इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामातील ११वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाबने सीएसकेला ५४ धावांनी पराभूत केले. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव होता. यानंतर भारताचे माजी खेळाडू आरपी सिंग यांनी सीएसकेच्या खराब खेळीवर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, जर सीएसकेला आयपीएल २०२२मध्ये अजून सामन्यांमध्ये अपयश आले, तर सीएसकेचे प्ले-ऑफमध्ये स्थान मिळणे कठीण होईल. त्यांच्या मते सीएसके या स्पर्धेतून लवकरच बाहेर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आरपी सिंग (RP Singh) क्रिकबजशी बोलताना म्हणाले, “सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत होणे हे दाखवत आहे की, सीएसकेचा (CSK) कठीण काळ सुरू आहे. अशातच संघ अजून एक सामना पराभूत झाला, तर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल. तेव्हा खराब रन रेट आडकाठी करेल. कारण, अजून अनेक सामने खेळायचे आहेत.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “आयपीएलमध्ये १० संघ असल्यामुळे तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की, गणित काय असेल, प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांना किती अंकांची गरज असेल. आम्ही आत्तापर्यंत त्या सीएसकेला पाहिले नाही जी अगोदर होती. एक भागीदारी सोडली, तर संघाचा शीर्ष क्रम आणि मधल्या फळीने सर्वांनाच निराश केले आहे. सीएसकेवर आयपीएलच्या या हंगामातून लवकरच बाहेर पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.”
आयपीएलच्या १५व्या हंगामात सीएसके संघात अनेक बदल करण्यात आले. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे आणि रवींद्र जडेजाला संघाचा कर्णधार बनवले आहे, परंतु त्याने संघासाठी अजूनपर्यंत काही खास कामगिरी केली नाही. उलट संघाला अपयश आले आहे. तसेच, संघात अनेक नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सीएसकेने आयपीएल इतिहासात ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राडाच ना! आवेश खानने केली बुमराह अन् शमीलाही न जमलेली कामगिरी; ‘या’ खास यादीत नोंदवले नाव
हैदराबादविरुद्ध विजयी पताका फडकावल्यानंतरही केएल राहुलला आहे ‘या’ गोष्टीची खंत; म्हणाला…
ताकदच बनली कमजोरी! लखनऊच्या फलंदाजांकडून SRHच्या ‘स्पीडस्टार’ उमरान मलिकची धू धू धुलाई