भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा याने खूपच कमी वयात आपली ओळख बनवली आहे. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर तो सतत जगभरातील चाहत्यांना हैराण करत आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) त्याने अशीच एक कामगिरी केली. प्रज्ञानंदाने फिडे वर्ल्ड चेस टुर्नामेंटच्या उपांत्य फेरीतल फाबियानो करुआईना याला मात देत अंतम सामन्यात धडक दिली आहे. तो या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणारा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.
फिडे वर्ल्ड चेस टुर्नामेंटमच्या उपांत्य फेरीतल आर प्रज्ञानंदा यायने 3.5 – 2.5 असा विजय मिळवला. त्याने हा सामना टायब्रेकमध्ये जिंकला. आता प्रज्ञानंदा अंतिम सामन्यात नॉर्वेचा पाच वेळचा चॅम्पियन मॅग्नस कार्लसन याच्याशी भिडणार आहे. कार्लसनने उपांत्य फेरीत अजरबेजानचा निजात अबासोव याचा 1.5 – 1.5 असा पराभव केला होता. प्रज्ञानंदा याने फाबियानोसोबतची ही मालिका 1-1 अशा बरोबरीवर संपवली होती आणि नंतर टाय ब्रेकमध्ये विजय मिळवला.
दिग्गज विश्वनाथ आनंद यांच्यानंतर प्रज्ञानंदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. आनंद यांना जगातील महान बुद्धिवळपट्टूंमध्ये केली जाते. आता प्रज्ञानंदा देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचतालच प्रज्ञानंदाने पुढच्या वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. 18 वर्षीय प्रज्ञानंदा कँडिडे्टस टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा जगातील तिसरा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दिग्गज बॉकी फिशर आणि कार्लसन यांनी ही कामगिरी केली आहे. (R Praggnanandhaa reaches final to clash with World No 1 Magnus Carlsen)
महत्वाच्या बातम्या –
“बुमराह आमच्या संघात हवा”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिती, शर्विन, क्षितिज आणि राघवला विजेतेपद