वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान महत्त्वाचा सामना खेळला गेला. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने वर्चस्व गाजवले. 172 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडला रचिन रवींद्र व डेवॉन कॉनवे यांनी आक्रमक सुरुवाती दिली. यादरम्यान रचिन याने आपल्या पहिल्याच विश्वचषकात अनेक विक्रमांना गवसणी घातली.
या सामन्यात 172 धावांची गरज असताना रचिन याने सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्विकारले. बाद होण्यापूर्वी त्याने 34 चेंडूंमध्ये तीन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. यासह तो विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या नावे आता नऊ सामन्यांमध्ये 70 पेक्षा जास्त सरासरीने 565 धावा जमा झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने या यादीमध्ये क्विंटन डी कॉक, विराट कोहली डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांना मागे सोडले.
याशिवाय वयाच्या 25 वर्षापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या बाबतीतही त्याने सचिन तेंडुलकर याला मागे टाकले. सचिनने वयाची पंचविशी पार करेपर्यंत विश्वचषकात 523 धावा केल्या होत्या. याशिवाय आपल्या पहिल्याच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा बाबतीत त्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो याचा विक्रम मोडीत काढला. त्याने मागील विश्वचषकात 532 धावा बनवलेल्या.
रचिन रवींद्र याने आपल्या पहिल्याच विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करताना आत्तापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. तसेच त्याच्या नावे दोन अर्धशतके देखील जमा आहेत. न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी व अंतिम फेरीत पोहोचल्यास त्याच्याकडे अधिक धावा करण्याची संधी असेल.
(Rachin Ravindra Broke Sachin Tendulkar And
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप