मुंबई। पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी २० मुंबई लीगमध्ये एका संघाच्या फ्रॅन्चायझीसाठी तब्बल ६.५ कोटीची बोली लागली आहे. या लीगमधील हा संघ सर्वात महागडा ठरला. या फ्रॅन्चायझीचे नाव मुंबई नॉर्थ असून ही फ्रँचायझी रेडियस डेव्हलपर्स, या कंस्ट्रक्शन कंपनीने विकत घेतली आहे. या कंपनीचे मालक संजय छाब्रिया हे आहेत.
या टी २० मुंबई लीगमधील सहा संघांच्या फ्रॅन्चायझींसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आवारात बुधवारी लिलाव झाला. त्यानंतर गुरुवारी या संघांच्या फ्रॅन्चायझींची नावे जाहीर करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमावेळी टी २० मुंबई लीगचा अँबेसेडर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता.
या लीगमधील मुंबई नॉर्थ- सेंट्रल संघाची फ्रॅन्चायझी पिके हॉस्पिटॅलिटी यांनी ३ कोटी देऊन मिळवली. त्याचबरोबर बाकी चार फ्रॅन्चायझी ट्रान्सकॉम लिमिटेड, अभिनेता शरद कपूरचा समावेश असणारा ज्युपिटर ग्रुप यांच्या नेतृत्वाखालील संघ, श्री नमन ग्रुप या कंस्ट्रक्शन कंपनीला आणि स्टार कनेक्ट यांना देण्यात आलेले आहे.
या फ्रॅन्चायझींसाठी २६ जणांनी स्वारस्य दाखवले होते. त्यातील ९ जणांनी या बोलीचे डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात सादर केले. या लीगचे उदघाटन मागील नव्हेंबरमध्येच करण्यात आले होते परंतु यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. त्यात संघमालकांचे बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून तपासणी करण्यासाठी कमी वेळ मिळाला.
ही लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने आयपीएललाही सुरुवात होणार आहे.
It was a great day as #T20Mumbai's League Ambassador, @sachin_rt and other dignitaries addressed the media at a press conference. Here are some 📷#CricketChaRaja pic.twitter.com/TvNCpg89os
— T20 Mumbai (@T20Mumbai) February 22, 2018