राफेल नदालने २००५ साली पहिल्यांदाच फ्रेंच ओपन स्पर्धेत भाग घेतला आणि विशेष म्हणजे १९ वर्षीय नदाल ती स्पर्धा जिंकलाही. फ्रेंच ओपन पहिल्याच वेळी खेळत असताना ती जिंकण्याची कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे.
आज २०१७ साली त्याने विक्रमी १३ वर्षांत १०व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. १३ वर्षात ३ पराभव आणि १० विजेतेपद अशी मोठी कामगिरी नदालने केली. २००९, २०१५ आणि २०१६ या वर्षी या महान खेळाडूला फ्रेंच ओपनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. २०१५ आणि २०१६ वर्षातील पराभव हा दुखापत आणि फॉर्म यामुळे झाला असला तरी २००९ साली नदालला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२००५ ते २०१७ या १३ वर्षांत नदालने केलेल्या फ्रेंच ओपनमधील कामगिरीचा हा थोडक्यात आढावा…