२०१७ चा फ्रेंच ओपन विजेता आणि चौथा मानांकित नदालने विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. काल झालेल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रलियाच्या जॉन मिलमनचा ६-१, ६-३, ६-२ सरळ असा सेटमध्ये पराभव केला.
तब्बल ९ वेळा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदालने फ्रेंच ओपन नंतर प्रथमच कोर्टवर येत हा सामना जिंकला. तो तब्बल महिनाभर टेनिस स्पर्धांपासून दूर होता. दोन वेळचा विजेता असलेला नदाल यावेळी तिसऱ्या विजेतेपदासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.
याबरोबर नदालने कारकिर्दीत ८५० वा विजय मिळवला. अशी कामगिरी करणारा तो केवळ ७वा खेळाडू आहे.
With his win at Wimbledon today, Rafael Nadal reaches another major milestone. pic.twitter.com/Ucf8g0nTcb
— ESPN (@espn) July 3, 2017