स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने विम्बल्डन (Wimbledon) टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नदालचा विम्बल्डनमधील उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस याच्यासोबत होणार होता. परंतु पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे नदालने उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडण्याचे ठरवले आहे. त्याने याचवर्षी २ ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन आपल्या नावावर केली होती. विम्बल्डनमध्येही तो विजयाचा प्रबळ दावेदार होता.
Until next time, Rafa 👋
Wishing you a speedy recovery.#Wimbledon
— Wimbledon (@Wimbledon) July 7, 2022
नदालच्या पोटातील एक स्नायू ७ मिलीमीटरपर्यंत फाटला आहे. याच कारणास्तव त्याला विम्बल्डनमधून हटण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याची उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्सशी भिडंत झाली होती. याच सामन्यादरम्यान नदालला ही दुखापत झाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॅट अन् बॉल दोन्हीने चमकला, हार्दिक पंड्याने इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू प्रदर्शनासह विश्वविक्रम केला
‘कर्णधार’ रोहितचा विषयच खोल! इंग्लंडविरुद्धची पहिली टी२० जिंकत विश्वविक्रम नावावर
‘विराट कोहली सचिन आणि ब्रॅडमनपेक्षाही महान खेळाडू’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा दावा