प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीने अर्सेनलचा २-० असा पराभव केला. अर्सेनलचा संघ युनाई एम्री या नवीन मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच खेळत होता. एम्री यांच्या आधी अर्सेने वेंगर यांनी २२ वर्षे हा क्लब सांभाळला आहे.
मॅंचेस्टर सिटीने मागील प्रीमियर लीग १००० असे विक्रमी गुण मिळवत जिंकली आहे. तर अर्सेनल सहाव्या स्थानावर होता.
यावेळी रहीम स्टर्लिंग आणि बेरनॅर्दो सिल्व्हाने हे गोल केले. सिटीने पहिल्याच सामन्यात दोन गोल करत हे सिद्ध केले की संघ जरी वेगळा असला तरी कामगिरी सारखीच आहे.
सिटीने 2018-19 च्या प्रीमियर लीग हंगामासाठी एक विजयी सुरुवात केली आहे.पेप Guardiola च्या बाजूने तीन गुण जिंकून लीग हंगामाचा सकारात्मक प्रारंभ झाला. तर एम्री याच्या कारकिर्दीस पराभवाने सुरुवात झाली.
सिटीने आधीपासूनच आक्रमक खेळ सुरू केला होता. अर्सेनलही हल्ले परतवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. नवीन मॅनेजरच्या मार्गदर्शानाखाली खेळत असेलेल्या आर्सेनलला वेळ लागेल.
अर्सेनल चाहत्यांची यावेळी निराशा झाली. त्यांना वाटले पेपच्या सिटीकडून आपण जिंकू पण सीटी चांगली खेळली.
तसेच एम्री यांनी खेळाडूंसोबत काही आठवड्यात सरावासाठी सर्वाधिक वेळ घालवला तर पेप यांचे काही खेळाडू मागील दोन आठवड्यात क्लबमध्ये आले. कम्युनिटी शिल्ड जिंकून त्यांना हरवणे हे अर्सेनलसाठी जरा अवघड होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जुवेंट्सकडून पहिला गोल करण्यास रोनाल्डोला लागले फक्त ८ मिनिटे
–मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम
–प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय