---Advertisement---

वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य

---Advertisement---

मागील दोन वर्षांपुर्वी म्हणजेच २०१९ मध्ये जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला होता; तेव्हा कसोटीत पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज राहकीम कॉर्नवाल याची खूप चर्चा झाली होती. या मालिकेतून १४० किलो वजन असणाऱ्या या गोलंदाजांने आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले होते.

विशेष म्हणजे, त्याने (Rahkeem Cornwall) भारतीय दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला आपल्या कारकिर्दीतील पहिली शिकार बनवली होती. परंतु २०१६ पूर्वी त्याचा स्वतःवर एवढा आत्मविश्वास नव्हता. मात्र भारतीय संघाविरुद्ध सराव सामना खेळताना खुद्द विराटने त्याचे आयुष्य बदलले होते. याच जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूचा काल (१ फेब्रुवारी) वाढदिवस होता.

२०१६ मध्ये राहकीम भारताविरुद्धच्या सराव सामन्यात एकादश इलेव्हनचा भाग होता. त्या सामन्यात त्याने पाच गडी बाद केले होते आणि स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुजाराला क्लीन बोल्ड केलं होतं. यानंतर कोहली आणि त्यानंतर रहाणे त्याचे बळी ठरले. राहकीमचा हा सामना तितका खास नव्हता परंतु या सामन्यानंतर जे घडले त्याची सर्वत्र चर्चा झाली होती.

सामन्यानंतर कोहलीने राहकीमला बोलावून कसोटी मालिकेआधी त्याच्यासोबत नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. याविषयी बोलताना राहकीमने ईएसपीएनला सांगितले होते की, “जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एख असणाऱ्या विराटने मला नेटमध्ये गोलंदाजी करायला सांगितले होते. हा माझ्या जिवनाला वेगळे वळण देणारा क्षण होता. आपण बरेच काही मिळवता ज्यासाठी धैर्य आवश्यक असते. आपण काय करू इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करायले हवे.”

राहकीमला त्याची उंची आणि लठ्ठपणामुळे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कोणतीही अडचण आली नाही. त्याने ६५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २२.७६ च्या सरासरीने २४१३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २४.०९ च्या प्रभावी सरासरीने ३१० विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अवघे ३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान ३५.२३च्या सरासरीने त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ७५ धावांवर ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“येत्या १० वर्षात शुबमन गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी सलामीवीरांमध्ये असेल”

केकेआरचा शिलेदार नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

चालू सामन्यात फिल्डर कपडे बदलण्यात व्यस्त अन् चेंडू सीमारेषेपार, पाहा मजेशीर व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---