आयपीएल 2024 मध्ये आज चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. तसेच या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने लखनऊ समोर 194 धावांचे लक्ष्य दिले होते. पण सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 20 धावांनी राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे.
याबरोबरच या सामन्यात राजस्थानने लखनऊसमोर 194 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला 20 षटकात 6 बाद 173 धावाच करता आल्या. निकोलस पूरन ६४ धावांची नाबाद खेळी केली. 41 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
First game, first win. Halla Bol, Rajasthan! 🔥💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 24, 2024
तसेच केएल राहुलने 58 धावांची खेळी केली. राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंड बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर नांद्रे बर्गर, आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग-11-
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
- GT Vs MI : सामन्यापूर्वी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला,’कर्णधारपदासाठी…
- कर्णधार संजू सॅमसनचे धमाकेदार अर्धशतक,अन् हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी लखनऊपुढे 194 धावांचे आव्हान