---Advertisement---

गंभीर म्हणतो, या खेळाडूमुळे शिखर धवनवर असेल दबाव

On: गुरूवार, जानेवारी 9, 2020 8:10 PM
---Advertisement---

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की शिखर धवनवर भारतीय संघात स्थान कायम राखण्यासाठी दबाव असेल कारण केएल राहुल सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करत आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे धवन दोन महिने क्रिकेट पासून दूर होता, आता त्याने पुनरागमन केले आहे. श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यात त्याने पुनरागमन करताना 29 चेंडूंत 32 धावा केल्या, तर राहुलने 32 चेंडूंत 45 धावा केल्या. त्यामुळे भारताला 143 धावांचे लक्ष्य सहज गाठता आले.

गंभीर म्हणाला, “राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जेव्हा जेव्हा मी राहुलला फलंदाजी करताना पाहतो तेव्हा प्रत्येक वेळी आश्चर्य वाटते की तो कसोटी क्रिकेटमध्ये असेच का खेळत नाही. त्याच्याकडे असलेली क्षमता लक्षात घेता असे वाटते की कसोटी क्रिकेटमध्येही तो 50 चेंडूत 100 धावा करू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---