---Advertisement---

‘हिटमॅनबाबत घेतलेला तो निर्णय बरोबरच’, प्रशिक्षक राहुल द्रविडचा रोहितला पाठींबा

On: बुधवार, जून 8, 2022 12:17 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (९ जून) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. केएल राहुल या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. या मालिकेआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी त्यांनी रोहित शर्माच्या अनुपस्थितीचे कारणही स्पष्ट केले आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. याबाबत द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, “रोहित हा आमच्यासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणारा महत्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात त्याने खेळावे अशी मागणी करणे योग्य नाही. तसेच काही वरिष्ठ खेळाडूंना तंदुरूस्त आणि ताजतवाणे राहण्यासाठी विश्रांती देेणे आवश्यक असते.”

रोहित बरोबरच विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आगामी काळात संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे.

या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) संघात पुनरागमन करणार आहेत. या चर्चेदरम्यान द्रविड यांनी पंड्याच्या कामगिरीचे कौतुक करत म्हटले, “त्याने आयपीएलमध्ये उत्तम नेतृत्व करत चांगले उदाहरण सादर केले आहे. या हंगामात त्याचा अष्टपैलू खेळ पाहुन आनंद झाला. भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.”

कार्तिकलाही २०१९च्या विश्वचषकानंतर नीळी जर्सी घालण्याची संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना त्याने अनेक सामन्यात फिनीशरची भुमिका पार पाडली आहे. यावेळी त्याने १८३.३३च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या असून त्याला या हंगामाचा ‘सुपर स्ट्रायकर’ हा पुरस्कार मिळाला आहे. या हंगामात त्याची सरासरीही विराटपेक्षाही अधिक राहिली. त्याने १६ सामन्यात ५५च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही चांगले केले. याच कामगिरीमुळे त्याने भारतीय संघात स्थान पक्के केले आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळणार संधी? प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे महत्वाचे संकेत

काय सांगता! भारत कधीही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला नाही टी२० मालिका, पाहा आकडेवारी

द्रविडसह पंत, श्रेयस, केएल अन्य भारतीय संघापेक्षा ३ दिवस उशीरा जाणार इंग्लंडला; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---