भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचे व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि गंभीर असे आहे. मैदानावरील त्यांचे आचरण, खेळण्याबाबतची गंभीरता आणि त्यांचे वर्तन हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. ते अगदी त्यांचे कपडे परिधान करण्यातबाबतही खूप गंभीर असतात. आपण देशाचे प्रतिनिधित्त्व करतो त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीबाबत सावधान असले पाहिजे असे राहुल द्रविड यांचे मत होते. याच संदर्भातील एका घटनेचा उल्लेख भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याने केला आहे. “Belive: what life and cricket taught me” या आपल्या आत्मचरित्रात रैनाने या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
रैनाने आपल्या पुस्तकामध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले होते. रैनाने 30 जुलै 2005 मध्ये डांबूलामध्ये श्रीलंका विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
2006 मध्ये जेव्हा भारतीय संघ मलेशियामध्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरंगी मालिका खेळत होता. रैनाने ‘FCUK’ ब्रँडचा टी-शर्ट घातला होता. रैनाने आपल्या पुस्तकात लिहिले की, “हा टी-शर्ट घातलेला पाहून द्रविड मला म्हणाला होता की, तुला माहिती आहे का तू काय घातले आहेस? तू भारतीय क्रिकेटपटू आहेस. तू सगळ्यांसमोर हा टी-शर्ट घालून जाऊ शकत नाहीस. यानंतर मी खूप घाबरलो होतो आणि त्यामुळे मी लगेच रूममध्ये गेलो आणि टी-शर्ट बदलला. नंतर तो टी-शर्ट फेकूनही दिला.”
द्रविड खेळाडूंच्या वर्तणुकीबद्दल गंभीरता
रैनानी सांगितले की, संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड हे खेळाडूंच्या शिस्तीबाबत खूप कठोर होते. सर्वसामान्य लोकांसमोर खेळाडूने कसे राहायचे याबाबत ते खूप गंभीर होते. “माजी कर्णधार राहुल द्रविड हे भारतीय संघासाठी खेळणे ही खूप अभिमानाची गोष्ट मानत होते. त्यांचे असे मत होते की, क्रिकेटपटू देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवायला पाहिजे की, आपण काय घालत आहोत किंवा एखाद्या व्यक्तीसमोर आपण कसे वागत आहोत? मला तर कधी-कधी असे वाटत होते की मी त्यांना जाऊन म्हणावे की, आता जरा आराम करा आणि थोडे हसा,” असे रैना पुढे बोलला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाचा धुव्वा उडवण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह न्यूझीलंड संघ उतरणार मैदानावर!
भारीच! रबाडाचा विजेहून अधिक वेगवान चेंडू, फलंदाजाला काही कळायच्या आतच उडाले स्टंप्स
‘इंग्लंडविरुद्धचा विजय भारतापुढे बिनकामी,’ न्यूझीलंडच्या अव्वल गोलंदाजाची कबुली