भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडला क्रिकेटमध्ये ‘ द वॉल ‘ म्हणून संबोधले जाते. त्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो आता नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. तसेच येत्या काही दिवसात अमेरिकेत होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमासाठी दिग्गज खेळाडूंसह राहुल द्रविडला देखील आमंत्रण देण्यात आले आहे.
येत्या ८ आणि ९ एप्रिल रोजी अमेरिकेत एमआयटी क्रीडा विश्लेषण परिषद आयोजित करण्यात येणार आहे. क्रिकेटवर चर्चे करण्यासाठी भारतातून एकमेव राहुल द्रविडला आमंत्रण देण्यात आले आहे. या परिषदेत ‘शो मी द डेटा’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात राहुल द्रविडसह दक्षिण आफ्रिकन संघाचा माजी फलंदाज आणि भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन इंग्लंड संघाची माजी क्रिकेटपटू ईशा गुहा देखील सहभाग घेणार आहे.
तसेच डेल टेक्नॉलॉजीचे संचालक आलोक सिंग या चर्चेचे सूत्र संचालन करणार आहेत. या चर्चेचा मुख्य विषय “हाउजडाटा : हाउ एनेलिटिक्स इज रिवोल्यूशनाइजिंग क्रिकेट (विश्लेषण क्रिकेटमध्ये कशाप्रकारे क्रांती घडवत आहे)”, हा असणार आहे.
आलोक सिंगने गेल्या काही काळात अमेरिकेतील युवा क्रिकटपटूंचा विकास करण्यासाठी अनेक कार्य केले आहेत. तसेच या चर्चेत अनेक गोष्टीवर विशेष चर्चा केली जाणार आहे. ज्यात, वर्तमानकाळात क्रिकेट विश्लेषणाचे काय महत्व आहे. तसेच या काळात क्रिकेटमध्ये आणि येणाऱ्या आयपीएल स्पर्धेत विश्लेषण का महत्वाचे ठरू शकते. तसेच विश्लेषणामुळे खेळात आणखी काय भर पडू शकते, या गोष्टींचा समावेश असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार म्हणून धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळण्याबद्दल रिषभ पंतने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
क्यूट व्हिडिओ! आयपीएलच्या तयारीसाठी जॉस बटलरची मदत करतेय त्याची दोन वर्षांची लाडकी लेक