---Advertisement---

राहुल द्रविडची फलंदाजी तर खूप पाहिली असेल, आता गोलंदाजी पाहा

Rahul Dravid (1)
---Advertisement---

राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघानं टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) प्रशिक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्याचबरोबर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर भारताचा नवा प्रशिक्षक बनला आहे. पण यावेळी द्रविड कुठे आहे? भारताच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविड कुठे आहे, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात घोळत असेल, सध्या द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे.

राहुल द्रविडचा (Rahul Dravid) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ग्राउंड स्टाफसोबत क्रिकेट खेळत आहे. माजी भारतीय प्रशिक्षक गोलंदाजी करत आहेत. राहुल द्रविडनं जीन्स आणि टी-शर्ट घातलेला आहे. खेळाडूंशिवाय जवळपास चाहत्यांची गर्दी आहे. राहुल द्रविडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, राहुल द्रविड (Rahul Dravid) आयपीएल संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग बनू शकतो. तो राजस्थान रॉयल्समध्ये सामील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. याशिवाय राहुल द्रविड मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संपर्कात असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

द्रविडच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 164 कसोटी, 344 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला. 164 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 52.31च्या सरासरीनं 13,288 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 270 राहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्रविडच्या नावावर 63 अर्धशतकांसह 36 शतक आहेत. 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये द्रविडनं 39.16च्या सरासरीनं 10,889 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 71.23 राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 83 अर्धशतक आणि 12 शतक झळकावली आहेत, तर 1 टी20 सामन्यात त्यानं 31 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…
हार्दिक पांड्या एकच सामना खेळून मोडू शकतो गांगुलीचा विश्वविक्रम! विराट-रोहित खूप मागे
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा निकाल काय लागला?, सडेतोड उत्तर देत जाफरने वॉनची बोलती केली बंद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---