क्रिकेटटॉप बातम्या

राहुल द्रविडने सोडली टीम इंडिया! तब्येतीच्या समस्येमुळे एकटाच बंगळुरूला रवाना, तिसऱ्या वनडेसाठी…

भारतीय पुरुष वरिष्ठ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid)यांनी बुधवारी (11 जानेवारी) 50वा वाढदिवस साजरा केला, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची तब्येत ठीक नसल्याचे वृत्त समोर आले. ते भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात झालेल्या गुरुवारी (12 जानेवारी) दुसऱ्या सामन्यात संघासोबत होते, मात्र तिसऱ्या सामन्यासाठी ते तिरुअनंतपुरमला रवाना झाले नाही. त्यांनी थेट बंगळुरू गाठले आहे.

द्रविड यांना दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ब्लडप्रेशरचा त्रास जाणवू लागला होता, तेव्हा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. ‘काळजी करण्याचे काही कारण नाही. त्याची तब्येत आता ठीक आहे’, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला तेव्हा ते तिसऱ्या सामन्यासाठी संघासोबत असतील की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. आता मात्र डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवरून द्रविड तिसऱ्या सामन्यासाठी संघासोबत असण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यामध्ये यजमान संघ 2-0 असा विजयी आघाडीवर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने खेळताना गुवाहाटीत झालेल्या पहिल्या सामन्यात 67 धावांनी विजय मिळवला होता. त्यामध्ये रोहितबरोबर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी प्रभावी फलंदाजी केली होती. त्यानंतर दुसरा सामना कोलकातामध्ये खेळला गेला.  ज्यामध्ये भारताने गोलंदाज आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे 4 विकेट्सने विजय मिळवला.

दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याला 2 धावांवरच बाद केले. शनाकाने पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. तसेच कुलदीपने कुशल मेंडिस आणि असालंका यांच्याही विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे कुलदीपने 10 षटकात 51 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याला युझवेंद्र चहल याच्याजागी घेतले होते. त्याला सामनावीराचा पुरस्कारदेखील मिळाला. त्याला मोहम्मद सिराज (3 विकेट्स), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक यांची चांगली साथ लाभली. भारतीय गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रीलंका केवळ 215 धावसंख्याच उभारू शकली.

लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुलने संयमी खेळी केली. त्याने 103 चेंडूत नाबाद 64 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलने वाढवले रवींद्र जडेजाचे टेंशन! सामन्यानंतरचे जड्डूचे ट्वीट व्हायरल
हॉकी विश्वचषक 2023: भारत विरुद्ध स्पेन सामना कुठे पाहणार? संघ, रेकॉर्ड्स जाणून घ्या एकाच क्लिकवर

Related Articles