भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील त्याचे जुने सहकारी राहुल द्रविड आणि एसएस धोनीविषयी एक किस्सा सांगितला आहे. सेहवागच्या मते एमएस धोनीने एकदा खराब फटका खेळला होता आणि त्यानंतर द्रविड त्याच्यावर रागवला होता. द्रविड रागवल्यामुळे धोनीच्या खेळीत सुधार झाल्याचे सेहवागने सांगितले आहे. तसेच सौरव गांगुलीने घेतलेल्या एका निर्णयामुळे धोनीच्या कारकिर्दीत काय बदल घडला, याचाही सेहवागने खुलासा केला.
कारकिर्दीच्या सुरुवातीला एमएस धोनी भारतीय संघात एका हिटरच्या रूपात आला होता. मात्र, 2006-2007 मध्ये धोनीची आक्रमकता कामी झाली आणि तो एक चांगला फिनिशर झाला. धोनीमध्ये हा बदल का आला? याचा सेहवागने खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना सेहवाग म्हणाला की, “धोनीला द्रविडच्या नेतृत्वात फिनिशरची भूमिका सोपवली गेली होती. धोनीने एकदा खराब फटका खेळल्यामुळे राहुल द्रविड रागवला होता. मला वाटते त्या घटनेमुळे धोनी बदलला. 2006-2007 च्या दरम्यान त्याच्यात बदल आला आणि सामन्याचा शेवट करण्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली”
सेहवागने युवराज सिंग आणि एमएस धोनीच्या जोडीचेही कौतुक केले. त्याच्या मते भारतीय संघाने केलेल्या विक्रमी सलग 16 सामन्यातील यशस्वी धावांच्या पाठलागामध्ये यो दोघांनी महत्वाची भूमिका पार पाडली. तो म्हणाला, “धोनीने युवराजसोबत अविश्वसनीय भागीदारी केली, जेव्हा आम्ही विक्रमी सलग 16 वेळा यशस्वी धावांचा पाठलाग केला.” सेहवागने यावेळी स्वतः सोबत घडलेला धोनीसारखाच असाच एक किस्सा सांगितला. त्याने सांगितल्याप्रमाणे दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर याच कारणास्तव सचिन तेंडूकर आणि जवागल श्रीनाथ त्याच्यावर रागवले होते. यानंतर त्याचामध्येही बदल घडला होता.
सेहवागने धोनीच्या कारकिर्दीत कलाटणी देणाऱ्या गांगुलीने घेतलेल्या एका निर्णयाची माहिती दिली. त्याने सांगितले की, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण काही खास नव्हते. त्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खालच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला या भूमिकेत मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यानंतर सौरव गांगुलीने त्याच्या फलंदाजी क्रमात बदल केला. गांगुलीने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. 2005 मध्ये गांगुलीने एसएस धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. धोनीने देखील त्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेतला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली सुपरमॅन आहे, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचे विराटबद्दल भावनिक वक्तव्य
रिषभ पंत ट्रोलर्सच्या निशाण्यावर, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातही अपयशी






