आपल्या सर्वांना माहित आहे की, क्रिकेटपटूंंवर चाहते किती प्रेम करतात. तसेच काही चाहते तर मर्यादाही ओलांडण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे खेळाडू अनेकदा अस्वस्थ होतात. असेच काहीसे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविडबरोबर घडले होते. द्रविडने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता की, त्याच्या घरामध्ये एक अनोळखी मुलगी आली होती. तसेच तिने आपले घर आणि परिवारही सोडले होते.
द्रविडने (Rahul Dravid) विक्रम साठ्येबरोबरच्या (Vikram Sathaye) एका मुलाखतीत सांगितले होते की, “एका महिला चाहतीसोबतची ती घटना मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा मी सुरुवातीला क्रिकेटपटू बनलो होतो, तेव्हा माझे आई-वडील सर्व चाहत्यांना घरामध्ये येऊ देत होते. त्यामुळे मला त्यांची भेट घ्यावी लागत होती. एकदा तर हैद्राबादवरून एक मुलगी मला भेटण्यासाठी घरी आली होती.”
“त्यावेळी मी एका दौऱ्यावरून आलो होतो. तसेच दिवसा मी घरात झोपलो होतो, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला उठवले आणि मला सांगितले की, तुला भेटण्यासाठी एक चाहती हैद्राबादवरून आली आहे. ती इथे दीड तासांपासून वाट पहात आहे. मला वाटले की, ती केवळ माझा ऑटोग्राफ आणि फोटो घेऊन निघून जाईल,” असेही द्रविड म्हणाला.
द्रविड पुढे म्हणाला की, “मी त्या महिला चाहतीशी चर्चा केली. त्यानंतर त्या महिलेने घरी जाण्यास नकार दिला. ती म्हणाली की, मी माझे घर सोडून इथे आली आहे आणि मी तुमच्याबरोबरच राहणार आहे. तिच्याबरोबर खूप चर्चा केली. त्यानंतर मला पोलिसांना बोलवावे लागले. यानंतरच ती महिला घरातून गेली. आम्ही तिच्या आई-वडिलांनाही सांगितले.”
“या घटनेनंतर माझ्या आई-वडिलांना समजले आणि त्यानंतर ते कोणत्याही चाहत्याला घरामध्ये येऊ देत नसत,” असेही द्रविड पुढे म्हणाला.
द्रविड आपल्या काळात मुलींमध्ये खूप प्रसिद्ध होता. द्रविड अनेक टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये दिसत होता. त्यामुळे त्याच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली होती. तसेच त्याला भारतीय संघाचा चॉकलेट बॉयदेखील म्हटले जात होते. याबरोबरच तो खूप शांत आणि सभ्य व्यक्तीही होता. यामुळे चाहत्यांना तो खूप आवडत होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लाॅकडाऊनमध्ये तब्बल ३० हजार लोकांना जेवण पुरवतोय भारताचा हा स्टार कर्णधार
-आशिया खंडाबाहेर धोनीला हा पराक्रम कधीही जमलाच नाही पण पंतने मात्र
-क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..