भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून रविवारी (२३ जानेवारी) केपटाउनमधील न्यूलॅंड्स येथे खेळला गेलेला तिसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. हा तिसरा आणि शेवटचा सामना भारताने ४ धावांनी गमावला. या सामना विजयासह तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-० अशी नावावर केली आहे. या मालिकेत रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे संघाचे कर्णधारपद केएल राहुल (Captain Kl Rahul)कडे सोपवण्यात आले होते.
या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा खेळत ४९.५ षटकांत २८७ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाने ४९.२ षटकांत २८३ धावांवर सर्वबाद झाले. या पराभवानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Dahul Dravid) याने पत्रकार परिषद घेत भारताच्या पराभवाची बाजू (Rahul Dravid On India Defeat) मांडली आहे.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच चांगली झाली नाही. पहिला गडी बाद झाल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने अर्धशतक लगावत शानदार खेळी केली होती. तसेच दीपक चाहरने ३४ चेंडूत ५४ धावा केल्या. पण दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ ४९.२ षटकांत २८३ धावांवरच गुंडाळला गेला.
राहुल द्रविड म्हणाला की, “मला वाटते की हा निकाल आमचे डोळे उघडणारा आहे. एकदिवसीय संघासोबतची ही माझी पहिलीच मालिका होती आणि आम्ही खूप दिवसांनी एकदिवसीय सामने खेळलो. विश्वचषक अजून दुर आहे. त्यामुळे संघाला पुन्हा एकत्र येण्यास वेळ मिळेल. या वेळेत आम्ही सुधारणा करु.”
भारताचा प्रशिक्षक पुढे म्हणाला की, “आम्ही मधल्या षटकांमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी करु शकलो असतो. मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करू शकणाऱ्यांपैकी काही निवडीसाठी उपलब्ध नव्हते. आशा आहे की ते परत येतील तेव्हा संघाला आणखीन चालना मिळेल. दीपक चहरने याआधीही दाखवून दिले आहे की त्याच्याकडे खुप चांगली क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला आणखीन पर्याय मिळू शकतात. शार्दुल ठाकूरनेही उत्तम कामगिरी केली आहे. आम्ही त्याला आणखी एक संधी देऊ इच्छितो.”
हेही वाचा- Photo: पहिल्याच संधीत चँपियनसारखा खेळला, पण शेवटी नको तेच झाल्याने चाहरला कोसळलं रडू
पुढे राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही फलंदाजांच्या क्रमात फारसा बदल केलेला नाही. यामागे त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देणे हा आमचा विचार आहे आणि जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हाच तुम्ही त्यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा करू शकता. केएल राहुलने नुकतेच कर्णधार म्हणून काम केले आहे. त्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, तो शिकत राहील आणि मला खात्री आहे की तो भविष्यात आणखी चांगली कामगिरी करेल.”
तसेच तो शेवटी म्हणाला, “मी फक्त फिरकीपटूंना बाहेर काढणार नाही. आम्हाला मधल्या षटकांमध्ये आमच्या विकेट घेण्याच्या क्षमतेने चांगली कामगिरी करावी लागेल. या क्षेत्रात आम्ही कशी सुधारणा करू शकतो यावर आम्ही चर्चा केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पराभव, पराभव, पराभव! ‘कर्णधार’ राहुलचा पुढचा मार्ग खडतर, पहिल्याच मालिकेत लाजिरवाणा विक्रम नावे
Photo: पहिल्याच संधीत चँपियनसारखा खेळला, पण शेवटी नको तेच झाल्याने चाहरला कोसळलं रडू
जगाने पहिल्यांदाच पाहिली विराटच्या कन्येची झलक; पण विरुष्का म्हणतायेत ‘हे’ थांबवा
हेही पाहा-