भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड हा नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याची सज्जनता आणि सभ्यता याचे नेहमीच कौतुक होत असते. आजही जेव्हा शांत आणि संयमी खेळाडूंबद्दल चर्चा होते, तेव्हा द्रविडचे नाव आल्याशिवाय राहात नाही. नुकतीच एक अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात पुन्हा एकदा द्रविड किती साधा व्यक्ती आहे, हे समजते.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो एका पुस्तकांच्या स्टोअरमध्ये बसलेला दिसत आहे. याबद्दल अनेक सोशल मीडिया युजर्सने माहिती दिली आहे. सोशल मीडियावरील युजर्सच्या म्हणण्यानुसार भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांचे आत्मचरित्र ‘व्रिस्ट अशुअर्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन बंगळुरूच्या एका पुस्तकांच्या स्टोअरमध्ये होणार होते.
या कार्यक्रमासाठी द्रविड (Rahul Dravid) देखील आला होता. तो या कार्यक्रमासाठी जेव्हा आला, तेव्हा तो शांततेत मागच्या स्थानावर जाऊन बसला. यावेळी द्रविडने काळ्यारंगाचा मास्क घातला होता. त्याला सुरुवातीला कोणी ओळखले नाही. पण, जेव्हा द्रविडबद्दल सर्वांना कळाले, तेव्हा लोक त्याला जाऊन भेटले. यावेळी तो देखीलही विनम्रता दाखवत सर्वांशी बोलला. द्रविडच्या या अशा कृतीमुळेच त्याचे नेहमी कौतुक होत असते. यापूर्वीही अनेकदा त्याने अशाच काही घटनांमधून त्याच्यातील साधेपणा दाखवला आहे.
He walked in alone with a mask on, greeted Ram Guha which is when me and Sameer realized it was indeed Rahul Dravid, he happily sat in the last row without any fuss so much so that the girl sitting next to him didn't even realized who she was sitting with.
— Vinay Kashyap (@vinaykashy) May 9, 2022
He finally told people to talk to GRV instead of talking to him because it was an event to celebrate GRV! How can a person who has lead Indian cricket team to so many glories be so humble and down to earth! pic.twitter.com/03KSFlnPn6
— Vinay Kashyap (@vinaykashy) May 9, 2022
Indeed every word and feeling is so true with Rahul Dravid and Gundappa Sir! Rahul sir wanted to leave soon to give attention to the book launch, on the other side Gundappa sir gave his time so patiently and sweetly to each of his fans for autograph and photograph. https://t.co/PuXThUsW3x pic.twitter.com/vJ5SAyByoC
— Priya Pallavi (@Priya0298) May 12, 2022
द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असून आयपीएल सुरू असल्याने त्याला काही दिवसांसाठी विश्रांती मिळाली आहे. त्याने भारताचा प्रशिक्षक होण्यापूर्वी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भुषवले आहे. तसेच तो काही वर्षे भारताच्या १९ वर्षांखालील आणि अ संघाचाही प्रशिक्षक होता.
द्रविडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
राहुल द्रविडने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १६४ कसोटी सामने खेळले असून त्याने १३२८८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३६ शतकांचा आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ३४४ वनडेत त्याने १८८८९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १२ शतके आणि ८३ अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर तो एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला असून ३१ धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
पॉवरप्लेमध्ये सीएसकेचा मुकेश चौधरी बनला ‘सुपर किंग’, ‘या’ विक्रमात शमीला पछाडले
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही ‘या’ गोष्टीमुळे धोनी खुश; वाचा काय म्हणाला
प्लेऑफची आशा जिवंत, पण विजयाची आशा धूसर; कोलकाताचा हुकमी एक्का आयपीएलमधून आऊट