---Advertisement---

द्रविडने जागवल्या जोहान्सबर्गमधील पहिल्या शतकाच्या आठवणी; ‘त्या’ साथीदाराचे केले कौतुक

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 5:36 PM
dravid-practice
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India)  यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग मैदानावर सुरू आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे. हे तेच मैदान आहे, ज्या मैदानावर राहुल द्रविडने आपले पाहिले कसोटी शतक झळकावले होते. परंतु तो सामना अनिर्णीत राहिला होता. आता तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. अशातच मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याला जोहान्सबर्गच्या (Johanasburg) मैदानावर कसोटी सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने मोठे वक्तव्य केले आहे.

राहुल द्रविडने (Rahul Dravid) १९९७ मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावर झालेल्या सामन्यात १४८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४१० धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते. त्यानंतर जवागल श्रीनाथने भेदक गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात देखील राहुल द्रविडने आपला जलवा कायम ठेवला आणि ८१ धावांची खेळी केली. परंतु, सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाऊस आला आणि हा सामना अनिर्णीत राहिला होता.

याबाबत बोलताना राहुल द्रविडने म्हटले की, “मला लक्षात आहे की, आम्ही सामना जिंकण्याच्या खूप जवळ होतो. परंतु, पावसामुळे आम्ही सामना जिंकू शकलो नव्हतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पहिले शतक झळकावणे अप्रतिम होते. यामुळे आत्मविश्वासात भर पडते. या खेळीमुळे संपूर्ण कारकीर्दीत माझा आत्मविश्वास वाढला होता.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही निराश झालो होतो कारण चौथ्या आणि पाचव्या दिवशी आम्हाला सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, पावसामुळे आम्ही तो सामना गमावला होता. जवागल श्रीनाथसारखे गोलंदाज त्या संघात होते पण सध्या संघात जी खोली आहे ती तेव्हा नव्हती. असे असूनही आम्ही तो सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आलो.”  असे राहुल द्रविड म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

महत्वाच्या बातम्या :

ना धोनी, ना कोहली; भज्जीच्या ‘ऑल टाईम कसोटी प्लेइंग इलेव्हन’मध्ये फक्त ‘या’ २ भारतीयांची नियुक्ती

तो लवकरच मोठी खेळी करेल; महागुरू द्रविडची ‘या’ फलंदाजाबद्दल मोठी भविष्यवाणी

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---