जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण ११ सामने पार पडले आहेत. दरम्यान अनुभवी खेळाडूंबरोबरच आयपीएलमध्ये युवा खेळाडू त्यांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आतापर्यंत या हंगामात देवदत्त पड्डीकलपासून ते पृथ्वी शॉपर्यंत कित्येक युवा खेळाडूंनी त्यांची कमाल दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व युवा खेळाडूंना दिग्गज भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने प्रशिक्षण दिले आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन हे ‘अ’ दर्जाच्या भारतीय संघाचा भाग होते तेव्हा द्रविडने त्यांना ट्रेनिंग दिली होती. तर पृथ्वी शॉ, शुबमन गिल, पड्डीकल असे आयपीएल २०२०चा भाग असलेले इतर युवा खेळाडूंना १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत असताना द्रविडचे मार्गदर्शन लाभले होते.
यंदा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला सॅमसनने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २१४.८६च्या स्ट्राईक रेटने १५९ धावा कुटल्या आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सदस्य असलेला पड्डीकल हा संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत या हंगामात पड्डीकलने ३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांसह १११ धावा ठोकल्या आहेत.
तर काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला गिलदेखील शानदार प्रदर्शन करत आहे. त्याने २ सामन्यात १०५.४७च्या स्ट्राईक रेटने ७७ धावा केल्या आहेत. तर गेल्या काही वर्षांपासून दिल्ली संघासाठी शिखर धवनसोबत सलामीला दमदार कामगिरी करत असलेला शॉ यावर्षीही लयीत आहे. त्याने या हंगामात झालेल्या दिल्लीच्या २ सामन्यात खेळताना १३२.६९च्या स्ट्राईक रेटने ६९ धावा केल्या आहेत.
एवढेच नाही तर, सोमवारी बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळण्यात आलेल्या आयपीएल २०२०च्या दहाव्या सामन्यात इशान किशनने अतुलनीय प्रदर्शन केले. त्याने मुंबईकडून खेळताना ५८ चेंडूत ९९ धावांची शानदार खेळी केली. यात त्याच्या ९ षटकारांचा आणि २ चौकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! इतकी मोठी डाईव्ह तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल, पाहा व्हिडिओ
पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली
आरसीबीसाठी ‘धोनी’ बनला आहे एबी डिविलियर्स, जाणून घ्या काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे ५ संघ, चेन्नई आहे ‘या’ स्थानावर