बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल इतिहासातील विक्रम १८१वा सामना खेळला. याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत कोलकाता संघ तिसऱ्या स्थानावर आला.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स दरम्यान बुधवारी आयपीएलचा बारावा सामना दुबईमध्ये झाला. हा सामना राजस्थाचा १५०वा सामना होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर आहे. मुंबईने आयपीएल इतिहासात तब्बल १९० सामने खेळले आहे.
दोन वर्ष बंदी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलमध्ये १६८ सामने खेळले आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत ते ६व्या स्थानावर आहेत. सध्या श्रेयस अय्यर नेतृत्त्व करत असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ या यादीत १८० सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये एकही विजेतेपद न मिळवणारा रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ या यादीत १८४ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे संघ (Most Matches in IPL)
१९०- मुंबई इंडियन्स
१८४- रॉयल चॅलेंजर बेंगलोर
१८१- कोलकाता नाईट रायडर्स
१८०- दिल्ली कॅपिटल्स
१७९- किंग्ज इलेव्हन पंजाब
१६८- चेन्नई सुपर किंग्ज
१५०- राजस्थान रॉयल्स
१११- सनरायझर्स हैदराबाद
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली
तेवतियाची कमाल! ५ षटकार ठोकल्यानंतर घरच्यांच्या डोक्याला ताप, तब्बल…
ट्रेंडिंग लेख-
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून