---Advertisement---

या व्यक्तीने भारतीय क्रिकेटची प्रतिमा जगात मलिन केली, आता…

On: मंगळवार, जुलै 14, 2020 1:18 PM
---Advertisement---

मुंबई । बीसीसीआयने राहुल जोहरी यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर आता काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. त्यात डायना इडुल्जी यांनी तर जोहरींवर चांगलाच निशाना साधला आहे.

राहुल जोहरी यांचा राजीनामा बीसीसीआयने गुरुवारी मंजूर करत त्यांना कार्यमुक्त केले. यानंतर डायना इडुल्जी यांनी जोहरींवर तोफ डागली आहे. “जोहरी यांच्यामुळे भारतीय क्रिकेट आणि बोर्डाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होऊनही ते पदावर कायम राहिले. तसेच बोर्डाच्या आर्थिक गोष्टींबद्दल त्यांनी बाहेर माहिती लीक केली. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर त्यांनी या पदावर राहणे चुकिचे होते, ” असे यावेळी डायना इडुल्जी म्हणाला.

त्या पुढे म्हणाल्या, “ऑक्टोंबर 2018  साली ही घटना समोर आली. हे प्रकरण दाबण्यासाठी तक्रारदारावर दबाव टाकण्यात आला होता. सर्व प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला गेला. अध्यक्ष आणि माझ्यात मतभेद होते. मी स्पष्टपणे सांगितले होते की, सीओएमध्ये महिला सदस्य असल्याने मी घरामध्ये शांत बसणारी महिला नाही.”

बीसीसीआयचे प्रशासकीय कामकाज चालवणार्‍या  समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी म्हणाले होते की, सर्वच प्रकरणांमध्ये समितीचे सदस्य आणि पूर्व महिला क्रिकेटर डायना इडुल्जी यांचे मत विचारात घेतले जाईल. इडुल्जी यांनी माजी सीईओ राहुल जोहरी यांच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वच गोष्टी बदलू लागल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---