भारतीय संघाची डोकेदुखी थांबण्याची काही लक्षणे दिसत नाही. आधीच संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. आता केएल राहुल हा पण दुखापतग्रस्त झाल्याचे समोर येत आहे. त्याची दुखापत किती गंभीर हे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले आहे. राहुलला बुधवारी (21 डिसेंबर) अभ्यास सत्रादरम्यान हाताला दुखापत झाली. तो ठिक असल्याचे समोर येत आहे, मात्र तसे झाले नाहीतर भारताला त्याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. तसेच एकाला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधीदेखील आहे.
भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली 188 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा त्याचा कर्णधार म्हणून पहिला कसोटी विजय ठरला. दुसरा सामना गुरूवारी (22 डिसेंबर) मीरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे.
Indian batting coach said "Rahul seems to be fine, it doesn't look serious, doctors are looking at him".
(Rahul was hit on his hand while batting in nets).
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2022
राहुलची दुखापत गंभीर नाही, असे राठोड यांनी म्हटले. त्याची सामन्याच्या दिवशी पुन्हा एकदा टेस्ट होणार असून त्याच्या फिटनेसवर सर्वकाही अवलंबून असणार आहे. तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसला तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
पुजारा हा सध्या संघाचा उपकर्णधार आहे. बीसीसीआयने मंगळवारी (20 डिसेंबर) रोहितबाबत अपडेट देताना संघातील बदलही सांंगितले. त्याच्याजागी अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संघात घेतले असून राहुल संघात नसला तर त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी आहे. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 22 आणि 23 धावा केल्या.
रोहितला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे दरम्यान हाताची दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत गंभीर असल्याने तो त्यातून पूर्णपणे ठिक झालेला नाही. तसेच नवदीप सैनी हा देखील पोटाच्या स्नायूमुळे त्रस्त आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोफ्राने चेंडू चोरणाऱ्या महिलेला खडसावले; म्हणाला ‘तु त्या चेंडूने फ्लॅट विकत घे…’
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध करू शकतो संघपुनरागमन