भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वैशिष्ठ्य म्हणजे संघातील खेळाडू मैदानावर तर चाहत्यांचे मनोरंजन करतच असतातच. तसेच सोशल मीडियावर देखील ते आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ते आपल्या संघातील खेळाडूंचे फोटोज् आणि व्हिडिओज शेअर करत असतात. अशातच राजस्थान रॉयल्स संघातील अष्टपैलू खेळाडू राहुल तेवातियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपल्या घरी परतले आहेत. अशातच राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर राहुल तेवतियाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बॉटलला कीस करून आय लव्ह यू म्हणताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये संघातील इतर खेळाडू देखील दिसून येत आहेत. हा व्हिडिओ जोस बटलरच्या मुलीच्या वाढदिवसावेळचा आहे.
या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत लिहिले आहे की, “राहुल तेवतियाने नुकतेच प्रपोजल केले आहे.”
या व्हिडिओमध्ये ते खेळ खेळताना दिसून येत आहे. जेव्हा राहुल तेवातियाकडे उशी येते तेव्हा त्याला टास्क दिला जातो. त्या टास्कमध्ये त्याला म्हटले जाते की पाण्याच्या बॉटलला प्रपोज कर. त्यानंतर राहुल तेवतिया बॉटलला हातात घेऊन आय लव्ह यू म्हणाला. त्याने बॉटलला किसदेखील केले आणि अंगठीही घालण्याचे नाटक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/COprnOStSAh/?igshid=15a9j1gj7q2gc
राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल २०२१मधील कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने युवा संजू सॅमसनला संघाची जबाबदारी दिली होती. त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले होते. तरीदेखील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात ७ सामने खेळले. यात त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या हंगामात तेवातियाने ७ सामने खेळले यात त्याला ८६ धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा थाटच न्यारा, कोट्याधीश नव्हे तर चक्क अब्जाधीशांच्या घरचे आहेत लाडके जावई
दु:खद! मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाचे वडिल कालवश, काही दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण