इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धा आता तोंडावर येऊन ठेपली आहे. ९ एप्रिलपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांचे खेळाडूला तयारीला लागले आहेत. अनेक खेळाडूंनी सरावा सुरुवात केली आहे. तर काही खेळाडू सध्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतियाचा फलंदाजी सरावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तेवतियाने नुकताच त्याचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून आता त्याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याच्या सरावाचा व्हिडिओ शनिवारी (४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सने ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे की ‘राहुल तेवतिया आला आहे. विकेंटच्या सुरुवातीसाठी हे कसे आहे.’
या व्हिडिओमध्ये तेवतिया नेट्समध्ये फलंदाजी सराव करतानाही दिसत आहे. तसेच यादरम्यान तो स्विट हिट या शॉटचाही सराव करताना दिसत आहे. याशिवाय काही मोठे फटकेही मारतामा दिसत आहे. तसेच तो धावतानाही दिसत आहे.
How's this to start your weekend? ????@rahultewatia02 has arrived. ????#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/JogIpVU0Zp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 3, 2021
आयपीएल २०२० दरम्यान आला होता प्रकाशझोतात
तेवतिया आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (आताचे नाव पंजाब किंग्स) ३१ चेंडून नाबाद ५३ धावा फटकावल्या होत्या. यातील ३० धावा त्याने एकाच षटकात ५ षटकार मारत काढल्या होत्या. त्यानंतर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. तसेच त्याने या हंगामात चांगली कामगिरी करताना १४ सामन्यात २५५ धावा आणि १० विकेट्स घेतल्या होत्या.
यंदाच्या हंगामातही तेवतियाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राजस्थानला असणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्येही तेवतिया फॉर्ममध्ये
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तेवतियाने हरियाणाकडून चंदिगढ़ विरुद्ध खेळताना ३९ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७३ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत २ विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: ‘हे’ तीन संघ वाटत आहेत सर्वात कमकुवत; सर्वच्या सर्व आहेत माजी विजेते
आयपीएल २०२१: ‘हे’ तिघे पाडू शकतात आरसीबीसाठी धावांचा पाऊस
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक डॉट बॉल खेळणारे फलंदाज, एकाने तर जिंकली होती ऑरेंज कॅप






