आयपीएल २०१७ने जर काय दिले असे कुणी विचारले तर तरुण खेळाडूंची एक चांगली फळी यातून पुढे आल्याचं सहज ध्यानात येईल. त्यातील सर्वात आधी येणार नाव अर्थात राहुल त्रिपाठी. अतिशय कमी किंमतीत राहुलची पुणे संघाने खरेदी केली. परंतु ही आयपीएल राहुलने गाजवून संघातील आपली निवड सार्थ ठरवली.
९ सामन्यात ३९. ११ च्या सरासरीने तब्बल ३५२ धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीला तरीही उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळणार नाही. याचे कारण म्हणजे राहुलच वय. राहुलने उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळण्यासाठीच्या ३ अटी पूर्ण केल्या आहेत. परंतु त्याला एक वयाची अट पूर्ण करता आली नाही. या अटीप्रमाणे खेळाडूचा जन्म १ एप्रिल १९९१ नंतर झालेला असावा. परंतु राहुलचा जन्म हा २ मार्च १९९१ रोजी झालेला आहे. म्हणजेच नियमप्रमाणे त्याचा जमीन ३० दिवस आधी झाल्यामुळे त्याला या पुरस्कारापासून मुकावे लागणार आहे.
राहुल त्रिपाठीने या आयपीएलमध्ये जबदस्त खेळाचे प्रदर्शन करताना पुणे संघाचे आव्हान राखले. १०, ३३, ३१, ५९, ४५, ३८, ३७, ६ आणि ९३ अशा राहुलच्या या आयपीएल मधील खेळी आहेत.
उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळण्यासाठी आयपीएल २०१७ च्या नियमावलीत ४ अटी आहेत.
१. खेळाडूचा जन्म १ एप्रिल १९९१ नंतर झालेला असावा.
२. खेळाडूने ५ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामने खेळलेले असावे.
३. खेळाडूने २०१७ च्या आयपीएलपूर्वी २५ किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेले असावे.
४. त्याने यापूर्वी हा पुरस्कार जिंकलेला नसावा.