क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज 13 एप्रिल 2023 पासून रेलिगेशन फेरीला सुरुवात झाली. ‘अ’ व ‘ब’ गटातील बॉटम चे 4-4 संघ रेलीगेशन फेरीत खेळणार आहेत. या 8 पैकी केवळ 2 संघ प्ले-ऑफस साठी पात्र होतील. रेलीगेशन फेरीतील पहिली लढत रायगड मराठा मार्वेल्स व सांगली सिंध सोनिक्स यांच्यात झाली.
रायगड मराठा मार्वेल्स संघाने जोरदार सुरुवात केली. मध्यंतराला सांगली संघावर लोन पाडत रायगड संघाने चांगली आघाडी मिळवली. प्रशांत जाधवच्या सुपर टेन आणि विराज पतीलच्या जबरदस्त पकडीच्या जोरावर रायगड संघाने 27-9 अशी आघाडी घेतली होती.
मध्यंतरा नंतर सांगली संघाने चांगला प्रतिकार केला. मात्र रायगड संघाने 41-25 असा सामना जिंकत रेलीगेशन फेरीतील पहिला विजय मिळवला. रायगड मराठा मार्वेल्स संघाकडून प्रशांत जाधव ने 15 गुण मिळवले तर राज जंगम ने अष्टपैलू खेळ करत 11 गुण मिळवले. विराज पाटील ने 5 पकडी केल्या. सांगली कडून वैभव वाघमोडे ने चांगला खेळ केला.
बेस्ट रेडर- प्रशांत जाधव, रायगड मराठा मार्वेल्स
बेस्ट डिफेंडर्स- विराज पाटील, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- राज जंगम, रायगड मराठा मार्वेल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाकडून पृथ्वी शॉला नोटीस! सपना गिल प्रकरण भोवणार, वाचा सविस्तर






