रेलीगेशन फेरीच्या आज पाचव्या दिवशी झालेल्या सामन्यात रायगड मराठा मार्वेल्स, पालघर काझीरंगा रहिनोस संघांनी चौथा विजय मिळवत पहिला व दुसरा स्थानावर आपली जागा भक्कम करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. तर रत्नागिरी व नंदुरबार संघांनी प्रतिस्पर्धी संघाला नमवले.
आजच्या पहिल्या लढतीत पालघर काझीरंगा रहिनोस संघाने अटीतटीच्या लढतीत सांगली सिंध सोनिक्स संघावर 31-28 असा विजय मिळवला. पालघर संघाचा हा चौथा विजय होता. त्यामुळे पहिल्या दोन संघात जागा निश्चित करण्यासाठी हा विजय महत्वपुर्ण ठरेल. पालघर कडून राहुल सवर ने 9 तर राज साळुंखे ने 8 गुण मिळवले. तर सांगली कडून तुषार खडाखे ने 9 गुण मिळवले. तर दुसऱ्या सामन्यात रायगड मराठा मार्वेल्स संघाने लातूर संघाचा 50-16 असा धुव्वा उडवला. रायगडच्या प्रशांत जाधव ने 24 गुण मिळवले.
रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात एकतर्फी लढत बघायला मिळाली. धुळे कडून एकट्या मितेश कदम ने 25 गुण मिळवले तरी रत्नागिरी संघाच्या सांघिक खेळाने 63-43 असा विजय मिळवला. रत्नागिरी कडून श्रेयस शिंदे ने 20 तर वेद पाटील ने 18 गुण मिळवले. तर भूषण गुढेकर ने 5 पकडी केल्या.
आज झालेल्या शेवटच्या लढतीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाने परभणी पांचाला प्राईड संघावर 48-42 असा विजय मिळवला. नंदुरबार कडून अभिजित गायकवाड ने निर्णायक 10 गुण मिळवले. तर ओमकार गाडे ने अष्टपैलू खेळ केला. प्रसाद रुद्राक्ष ने चढाईत मिळवले 20 गुण तर हनुमान पोळे ने केलेल्या 7 पकडी संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित
मुंबईच्या मेंटरने ओळखली आरसीबीची कमजोरी! म्हणाले “तर तुम्हाला आणखी पराभव पहावे लागतील”