---Advertisement---

काय आहे रायगड रॉयल्सची ‘औरत है तो भारत है’ संकल्पना

---Advertisement---

महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 मध्ये 15 जून ही तारीख खास असणार आहे. रायगड रॉयल्स संघ यांच्या ‘औरत है तो भारत है’ या उपक्रमासाठी हजारो महिला थेट गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हजेरी लावतील. मात्र, हा उपक्रम नक्की काय आहे, याबाबत आपण जाणून घेऊया.

महिला सन्मान आणि सबलीकरणासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून ‘औरत हैं तो भारत हैं’ हा कार्यक्रम 15 जून रोजी एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे अतिशय धडाक्यात आयोजित केला जाणार आहे. रायगड रॉयल्स संघाचे संघमालक कपिल बाहेती आणि संघाच्या सीईओ अलिशा बाहेती यांच्या संकल्पनेतून, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार आणि सर्व एपेक्स कौन्सिल सदस्यांच्या सक्रिय पाठिंब्याने या उपक्रमाचे आयोजन केलं जातेय.

या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून महिलांना थेट स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी निमंत्रित केले जाते. केवळ प्रेक्षक नव्हे तर एक सन्माननीय उपस्थिती म्हणून या सर्व महिलांना स्टेडियमपर्यंत आणले जाईल. तसेच, विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी आणि योगदान दिलेल्या महिलांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. एमपीएल 2025 मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 10,000 पेक्षा जास्त महिला येण्याची शक्यता वर्तवली जातेय. या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्टेडियम गुलाबी रंगात रंगवले जाईल. या कार्यक्रमासाठी व यादरम्यान होणाऱ्या रायगड रॉयल्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स सामन्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रायगड रॉयल्स आणि एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

मागील वर्षी झालेल्या या उपक्रमात 13,000 महिलांनी स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळी रायगड व पुणेरी बाप्पा या संघाच्या खेळाडूंनी आपल्या जर्सीवर आपल्या आईचे नाव लिहिलेले. तसेच, आपल्या आईसह सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात उपस्थित झालेले. भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोम या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---