वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final 2025) सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणताच गोलंदाज करू शकला नाही. पॅट कमिन्सने लॉर्ड्सच्या मैदानावर त्याच्या घातक गोलंदाजीने शानदार प्रदर्शन केले. या गोलंदाजाने 18.1 षटकात फक्त 28 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये 6 विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या शानदार गोलंदाजीमुळे साउथ आफ्रिकेच्या फलंदाजांना चालू दिले नाही. पहिल्या डावात पूर्ण संघ 138 धावांवर ऑल आऊट झाला.
पहिल्या दिवशी सुरुवातीला 4 विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेंबा बावुमा आणि डेविड बेडिंघमने साउथ अफ्रीका संघाला सांभाळले होते. त्यांनी 94 धावा केल्या होत्या, व नंतर ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधाराने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, तेव्हा या कर्णधाराने त्या कर्णधाराला 36 वर बाद केले. त्यानंतर त्याने काइल वेर्रेने याला देखील 13 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने मार्को यान्सनला खातं उघडण्याची देखील संधी दिली नाही.
पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एका डावात 6 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी कोणी सुद्धा केलेली नाही. कर्णधार म्हणून कमिन्सने 9 व्या वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने या कामगिरीत बिषन सिंग बेदी याला देखील मागे टाकले आहे. कर्णधार म्हणून कमिन्सने लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वात चांगला स्पेल टाकत हे रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर केले आहे.






