---Advertisement---

MPL 2025: थाटात पार पडला ‘औरत है तो भारत है’ कार्यक्रम, रायगड रॉयल्सचा कौतुकास्पद उपक्रम

On: सोमवार, जून 16, 2025 5:19 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये रविवारी (15 जून) एक खास कार्यक्रम आयोजित केला गेला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स या सामन्याआधी रायगड रॉयल्स यांच्या पुढाकाराने ‘औरत है तो भारत है’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले. विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच, दोन्ही संघातील खेळाडूंच्या मातांना देखील आमंत्रित केले गेलेले.

रायगड रॉयल्स संघाचे संघमालक कपिल बाहेती आणि अलिशा बाहेती यांनी मागील वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात केली होती. पहिल्याच वर्षी तब्बल 14,000 महिलांना त्यांनी सामना पाहण्यासाठी मैदानावर बोलावलेले. एमपीएल 2025 मध्ये देखील त्यांनी याला व्यापक स्वरूप दिले. रविवारी रायगड विरुद्ध कोल्हापूर या सामन्याआधी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीने ठसा उमटवलेल्या महिलांचा सन्मान रायगड रॉयल्सतर्फे केला गेला. तर, दोन्ही संघातील खेळाडूंच्या आईंना खास या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले गेलेले. दोन्ही संघातील खेळाडू भारताच्या राष्ट्रगीतासाठी आपल्या आईसोबत मैदानात उतरले. यावेळी खेळाडूंनी आपल्या आईच्या नावाची जर्सी परिधान केली होती. यावर्षी मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 12,000 महिला आलेल्या.

रायगड रॉयल्सच्या सहमालक अलिशा बाहेती यांनी यावेळी बोलताना म्हटले, “मागील वर्षी आमच्या डोक्यात ही कल्पना आली. अशा कित्येक महिला आहेत जा स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून, त्यांना लोक ओळखतही नाही. अशाच महिलांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत.” या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील सहकार्य केले.

या कार्यक्रमानंतर झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या 160 धावांचा पाठलाग करताना कोल्हापूरचा कर्णधार राहुल त्रिपाठी याने अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसाठीच त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---