तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. तब्बल २९ वर्षांनी किनारी प्रदेशात असणाऱ्या या केरळच्या राजधानीत सामना झाला.
पावसामुळे हा सामना केवळ ८ षटकांचा झाला. तब्बल ३ तास उशिरा हा सामना सुरु झाला. असं असतानाही यावेळी द स्पोर्ट्स हबवर तब्बल ४० हजार प्रेक्षक आले होते.
जेव्हा फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी वाट पाहत होते तेव्हा याच मैदानात कुठेतरी इनडोअरमध्ये एमएस धोनी आणि संघासहकारी मनीष पांडे हे न्यूझीलँडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि टॉम ब्रूसबरोबर एक नवाच खेळ खेळत होते.
https://www.facebook.com/MahaSports/videos/511959582495646/
फुटबॉल प्रमाणे पायाने जरी चेंडू मारला जात असला तरी दोन कोर्टच्या बरोबर मध्यात ४ खुर्च्या ठेवून व्हॉलीबॉलच्या नेटसारखा भाग उभा केला होता. खेळाडू यावरून पायाने चेंडू एकमेकांना पास करत होते.
त्यामुळे नक्की या खेळाला फुटबॉल म्हणावे की व्हॉलीबॉल हा प्रश्न पडला होता.
हा विडिओ मार्टिन गप्टिलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/BbPdHb4gz48/
भारतीय संघाने हा सामना जिंकत मालिका २-१ अशी खिशात घातली. परंतु या मालिकेत भारतीय खेळाडू आणि न्यूझीलँड संगःचे खेळाडू अनेक वेळा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले.
विमान प्रवासात तर यश सोधी आणि युझवेन्द्र चहल हा दोन खेळाडूंनी चेसचे ३ सामने खेळले. युझवेन्द्रने ते सगळे जिंकले हा वेगळा विषय.
महा स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट्स आमच्या फेसबुक पेजवर: Maha Sports महा स्पोर्ट्स