भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी२० सामना रविवारी (१९ जून) बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत सध्या दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीवर असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही हातून निसटेल. मात्र, सामना जिंकल्यास पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास पहिल्यांदा घरच्या धर्तीवर भारत आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकण्यास यशस्वी ठरू शकतो. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता उभय संघात नाणेफेक झाली असून पुन्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
सामना सुरू झाला मात्र, सुरुवातीलाच पहिला चेंडू फेकण्याआधीच पावसाने हजेरी लावल्याने खेळ सुरू होण्यास उशिर झाला. त्यानंतर खेळाच्या नियमात बदल करत १९ षटकांचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. खेळ सुरू झाला. पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज गोलंदाजीस आला. इशान किशनने त्याच्या विरोधात दोन षटकार लगावत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर मात्र, लुंगी एनगिडीच्या पहिल्या षटकात इशान किशन आणि नंतर दुसऱ्या षटकात ऋतुराज गायकवाड बाद झाले.
ऋतुराज बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या ३.२ षटकांत २७ धावांवर २ बाद अशी होती. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत होते. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने व्यत्य आणला. लवकरच पाऊस कमी होऊन सामना सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे दिसले.
???? Update ????
Play has heen officially called off.
The fifth & final @Paytm #INDvSA T20I has been abandoned due to rain. #TeamIndia pic.twitter.com/tQWmfaK3SV
— BCCI (@BCCI) June 19, 2022
दरम्यान, ही मालिका २-२ च्या बरोबरीत पार पडल्याने मालिकेचा चषक कोणालाही मिळाला नाही. या मालिकेसाठी मालिकावीर म्हणून भुवनेश्वर कुमारयाला सन्मानित करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENG vs NZ | इंग्लंडला मोठा झटका, शेवटच्या कसोटीतून दिग्गज गोलंदाजाची माघार
‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण






