टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यामुळे भारतीय संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे.
शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन करून विजय मिळवला, पण त्याचा फायदा झाला नाही. आता सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत त्याचा विश्वचषकातील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. अशात सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला आहे. नेटकरी भारतीय संघाची सोशल मीडियावर मजा घेत आहेत.
भारतीय संघाने त्याचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघाला स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला. मात्र, त्यानंतरच्या अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यासोबतच्या सामन्यात संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. असे असले तरी, उपांत्य सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी संघाला दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागले.
रविवारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले. न्यूझीलंडच्या विजयासोबतच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. अशात नामिबियाविरुद्धचा सामना केवळ एक औपचारिकता बनला आहे.
नामिबियाविरुद्धच्या सामन्याला विश्वचषकाच्या पुढच्या फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने कसलेच महत्व उरलेले नाही. अशात चाहत्यांनी या सामन्यापूर्वी भारतीय संघाला लक्ष्य केले आहे. चाहते या सामन्याविषयी वेगवेगळे मीम्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. चाहते सामन्याविषयी त्यांची वेगवेगळी मतेही व्यक्त करत आहेत. अशात भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहली चांगलाच ट्रोल झाला आहे.
एका युजरने एक मीम शेअर केले आहे, ज्यात लिहिले आहे की ‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’ तसेच दुसऱ्या एका युजरने ट्वीट केले की ‘जर भारताने नामिबियाला ८० धावांच्या आत रोखले आणि ५ षटकांत आव्हान पूर्ण केले, तर संघ ३ तास लवकर विमानतळावर पोहचू शकतो.’
Indian captain virat kohli to ICC after today we are eliminated due to
New zealand won against Afghanitan#AfgvsNZ#IndvsNam #NZvAFG pic.twitter.com/Fy0S30xd9E— vabby (@vabby_16) November 7, 2021
https://twitter.com/fizzy_fizz1/status/1457340501263192064
https://twitter.com/RahilBashir_/status/1457580261932081160
If India restrict Namibia under 80 runs and chase it in 5 overs ,
They can reach their home 3 hours early .
Thanku
????????????????#INDvNAM pic.twitter.com/gCBuXL6VpD— ???????????????????? ???????????????????? ????????????????????(ᵃˢˡⁱ ʷᵃˡᵃ) (@VKV7_) November 8, 2021
Start Sport:- watch live match between #INDvNAM at 7:30 PM onwards.
Me :- pic.twitter.com/3vdXV2hPHF
— Amrendra Yadav (@ydvvv_707) November 8, 2021
Last day for Kohli as a captain in white ball cricket.
Mood : #INDvNAM pic.twitter.com/AWFoR38pC7
— Naveen (@_naveenish) November 8, 2021
https://twitter.com/_Mohammad_SQ/status/1457666640594837507/photo/1
https://twitter.com/psycotroller2/status/1457337446148886529
How's the Josh ?? #INDvNAM The "DEAD Rubber"
#DemonetizedMatch ???? pic.twitter.com/k21sEkBrFU
— Indian Castro???? (@Mr_Singh86_) November 8, 2021
विराट कोहलीसाठी हा त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील कर्णधाराच्या रूपात खेळला जाणारा शेवटचा सामना असणार आहे. विराटने यापूर्वीच घोषणा केले होती की, तो टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. अशात न्यूझीलंडविरुद्ध १७ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या मायदेशातील मालिकेत कर्णधारपदाची जाबाबदारी कोण स्वीकारणार हे पाहण्यासारखे असणार आहे.
याव्यतिरिक्त संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसाठी देखील हा शेवटचा सामना असणार आहे. शास्त्रींचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार होता. आता दिग्गज राहुल द्रविडला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौ-यावर जाणार ऑस्ट्रेलिया; ‘या’ दिवशी होणार मालिकेला प्रारंभ






