पुणे । नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत रोमानियाच्या जॅकलिन अडीना क्रिस्टियन, चीनच्या कै-लीन झाँग, रशियाच्या मरिना मेलनिकोवा, स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत रोमानियाच्या कलिन अडीना क्रिस्टियन हिने तिसऱ्या मानांकित चीनच्या जिया-जिंग लुचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-4असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. रशियाच्या मरिना मेलनिकोवा हिने पाचव्या मानांकित ओल्गा दोरोशीनाचा 5-7, 6-4, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.
हा सामना 2 तास 45मिनिटे चालला.स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने सहाव्या मानांकित इस्राईलच्या डेनिझ खझानुकचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैना हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत क्वालिफायर रशियाच्या याशिना इक्तेरिनाचा 6-1, 5-7, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 42मिनिटे चालला. चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीने हंगेरीच्या रेका-लुका जनीचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरा फेरी):
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि.मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया) 7-5, 4-6, 6-4;
अंकिता रैना(भारत)(2)वि.वि. याशिना इक्तेरिना(रशिया) 6-1, 5-7, 6-1;
जॅकलिन अडीना क्रिस्टियन(रोमानिया) वि.वि.जिया-जिंग लु(चीन)(3) 7-6(5), 6-4;
कै-लीन झाँग(चीन)वि.वि. क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड)(8) 4-6, 7-5, 6-2;
कारमान कौर थंडी(भारत)[4] वि.वि. रेका-लुका जनी(हंगेरी) 6-3, 6-2; 1hour 15
व्हॅलेरिया स्राखोवा(युक्रेन)वि.वि. कॅथरीना गेरलेच(जर्मनी) 7-6(0), 7-5;
मरिना मेलनिकोवा(रशिया)वि.वि. ओल्गा दोरोशीना(रशिया)(5) 5-7, 6-4, 6-1; 2hour 45
इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)वि.वि.डेनिझ खझानुक(इस्राईल)(6) 6-3, 6-4;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
अमिना अंशबा(रशिया)/कनिया पॉला(पोलंड)वि.वि.जॅकलिन क्रिस्टियन(रोमनिया)/ क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड) 6-3, 3-6, 10-8;
अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया) वि.वि.ऍना व्हॅसलिनोविच/ याशिना इक्तेरिना(रशिया) 6-4, 6-1;
शेरॉन फिचमन(कॅनडा)/कातरझायना पीटर(पोलंड) वि.वि.कॅटी ड्युन(ग्रेट ब्रिटन)/सराह ग्रे(ग्रेट ब्रिटन) 6-3, 6-0;
अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत)वि.वि.ची-यु-सु(तैपेई)/जिया-जिंग लु(चीन) 7-5, 6-2