सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मुथय्य मुरलीधरन यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मोठ्या कामगिरीसह महान क्रिकेटपटू म्हणून नाव कमावले आहे. पण आता अशा अनेक दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे चाहत्यांना त्यांना पाहाता येत नाही. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की त्यांना अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंना पुन्हा मैदानात पाहाता येणार आहे.
पुढील महिन्यात २ ते २१ मार्च दरम्यान रायपूर येथे खेळल्या जाणाऱ्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-२०’ मार्फत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि मुथय्या मुरलीधरन यांसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.
कोविड १९ च्या साथीमुळे पहिल्या सत्राच्या चार सामन्यांनतर ही मालिका थांबवण्यात आली होती. परंतु, उर्वरित सर्व सामने हे नव्याने रायपूरमधील शहिद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जातील.
प्रसिद्धिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार,” सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलत्करने दिलशान, यांच्यासह आणखी पाच देशातील माजी क्रिकेटपटूंचा समावेश या मालिकेमध्ये आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका या देशातील क्रिकेटपटूंचा समावेश यात होणार आहे. त्यामुळे माजी खेळाडूंना पुन्हा खेळताना पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे समजते.
देशात रस्ते सुरक्षिततेविषयी जनजागृती करणे हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. क्रिकेट हा देशातील लोकप्रिय खेळ असल्यामुळे खेळाडू येथे आदर्श नायक म्हणून पाहिले जातात. त्याचमुळे जनजागृती करण्यासाठी खेळाडू हा एक चांगला पर्याय असतात.
या स्पर्धेत कोरोनाच्या आधी पार पडलेल्या सामन्यांनुसार भारत २ सामने जिंकून अव्वल स्थानी आहे तर दक्षिण आफ्रिका एक सामना जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनेसुद्धा एक सामना जिंकला आहे तर ऑस्ट्रेलिया संघ एक आणि वेस्ट इंडिज संघाने दोन सामने गमावले आहेत.
सदर कार्यक्रमाबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, “रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-२० मालिकेमध्ये अशा दिग्गजांचे आयोजन करणे ही गर्वाची आणि सन्मानाची बाब आहे. दर चार मिनिटाला भारतात रस्त्यावर अपघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होणे ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावरील धोक्यांबद्दल जागरूक करणे ही चांगली संकल्पना आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ : दोन कोटी आधारभूत किंमत असलेले ‘हे’ तीन खेळाडू राहू शकतात लिलावात ‘अनसोल्ड’
…ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ४५ मिनिटांत अवघ्या १५ धावांवर संपला होता एका संघाचा संपूर्ण डाव