---Advertisement---

जयस्वालचे अर्धशतक, तर अश्विनची झुंजार खेळी; चेन्नईला पराभूत करत राजस्थान प्लेऑफसाठी क्वालिफाय

On: शुक्रवार, मे 20, 2022 11:20 PM
R-Ashwin
---Advertisement---

आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरी सामन्यांचा टप्पा संपायला आला आहे. साखळी फेरीतील ६८वा सामना शुक्रवारी (२० मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना राजस्थानने ५ विकेट्स राखून जिंकला. यासह राजस्थान संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे.  

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले.

चेन्नईच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने धुव्वादार अर्धशतक केले. ४४ चेंडू खेळताना त्याने १ षटकार आणि ८ चौकारांच्या ५९ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार संजू सॅमसनने १५ धावांचे योगदान दिले. तसेच डावाअंती अष्टपैलू आर अश्विनने नाबाद ४० धावा करत संघाला सामना जिंकून दिला. २३ चेंडू खेळताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली.

या डावात चेन्नईकडून नवखा शिलेदार प्रशांत सोलंकीने जबरदस्त गोलंदाजी केली. २ षटके फेकताना २० धावा देत त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच सिमरजीत सिंग, मिचेल सेंटनर व मोईन अली यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून अष्टपैलू मोईन अली याने सर्वाधिक धावा केल्या. केवळ ७ धावांनी त्याचे शतक हुकले. ५७ चेंडू खेळताना ३ षटकार आणि १३ चौकारांच्या सर्वाधिक ९३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त चेन्नईकडून इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. कर्णधार एमएस धोनीने २६ धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वे १६ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांनी एकेरी धावेवर विकेट्स गमावल्या.

या डावात राजस्थानकडून ओबेय मॅककॉय आणि युझवेंद्र चहल यांनी दमदार गोलंदाजी केली. चहलने आपल्या कोट्यातील ४ षटके टाकताना २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर मॅककॉयने २० धावांवर २ फलंदाजांना बाद केले. तसेच ट्रेंट बोल्ट, आर अश्विन यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भावामुळे फसला कर्णधार बाबर आझम, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली थेट वॉर्निंग

शतकाला मुकणारा मोईन अली नाही चेन्नईचा एकटा फलंदाज, रैना ते ऋतुराज रांगच लागलीये

‘हिटमॅन’ रोहितची आणि दिनेश कार्तिकच्या करीयरची गाडी रुळावर आणणारा ‘अभिषेक नायर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---