मार्च महिन्यात उद्घाटन झालेले अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरले होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे सोडत नरेंद्र मोदी स्टेडियमने हा मान मिळवला होता. आता त्याच धर्तीवर भारतात आणखी एका मोठ्या स्टेडियमची उभारणी लवकरच सुरू होणार आहे. हे स्टेडियम जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल. या स्टेडियमच्या उभारणीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १०० कोटी रुपयांची मदत केली आहे.
‘या’ ठिकाणी होणार स्टेडियम
जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून प्रसिद्धी मिळत असलेले स्टेडियम राजस्थानमधील जयपुरपासून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोंप गावच्या हद्दीत असेल. राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष वैभव गेहलोत यांना राजस्थान विकास प्राधिकरणाने १०० एकर जमिनीचे बक्षीस पत्र नुकतेच बहाल केले आहे. या कामासाठी तब्बल ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इतर पैसे कर्ज तसेच मैदानावरील कॉर्पोरेट बॉक्स विकून मिळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतेय.
अशा असतील सुविधा
राजस्थान क्रिकेट संघटनेचे हे स्टेडियम प्रेक्षक क्षमतेच्या मानाने जगातील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम असेल. यामध्ये एकावेळी ७५,००० प्रेक्षक सामना पाहू शकतात. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १ लाख १० हजार तर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर १ लाख आसनक्षमता आहे. या मैदानावर इनडोअर खेळांसाठी देखील मैदाने उपलब्ध करून देण्यात येतील.
सवाई मानसिंह स्टेडियमचे महत्व होणार कमी
सध्या राजस्थानमधील सर्वात मोठे स्टेडियम जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम आहे. या स्टेडियमची क्षमता केवळ ३०,००० इतकी असून या ठिकाणी जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले नाहीत. २०१३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना या मैदानावरील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे हे घरचे मैदान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! बीसीसीआयने केली देशांतर्गत हंगामाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार सुरुवात
सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’
विश्वविजेता भारतीय शिलेदार उतरणार ‘या’ परदेशी लीगच्या मैदानात, केलं रजिस्ट्रेशन