आयपीएल स्पर्धेचे १४ वे हंगाम ९ एप्रिल पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा यंदा कोरानाच्या पार्श्वभूमीवरही भारतातच खेळवण्यात येणार आहे. अशातच सर्व संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या युवा अष्टपैलू खेळाडूला बंगळूरु संघाने रिलीज केले. तोच खेळाडू आता राजस्थान संघाकडून तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएल २०२० मध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने मुक्त केले होते. यंदा तो राजस्थान रॉयल्स संघाकडून मोठ मोठे फटके मारताना दिसून येणार आहे. शिवम दुबेला २०१९ मध्ये भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. तसेेच त्याची तुलना हार्दिक पंड्या सोबत केली जात होती. पण हार्दिकचे भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याला भारतीय संघातून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
यंदा त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ४.४० कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय संघात पुनरागमन करण्याची चांगली संधी असणार आहे. तो म्हणाला, “मी बर्याच स्थानी फलंदाजी आहे आणि मला कुठल्याही ठिकाणी खेळण्यास त्रास होत नाही. माझ्याकडून संघाला काय हवे आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जर माझी गरज वरच्या क्रमात असेल तर मी तिथे जाईल. जर ती खालच्या क्रमाने असेल तर मी फिनिशरची भूमिका देखील करू शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला,”मी कोणत्याही संघाकडून खेळत असलो तरी ही, माझे ध्येयपद जिंकणे हेच आहे. एक प्रोफेशनल म्हणून आपल्याला माहित आहे की आपल्याला काय हवे आहे, संघ आपल्याला काय देईल, आपली भूमिका काय आहे आणि प्रशिक्षक आपल्याला काय देणार. राजस्थान रॉयल्सचा मी आभारी आहे ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला.”
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतने उर्वशी रौतेलाला केले होते ब्लॉक, आता अभिनेत्रीने दिले ‘असे’ प्रत्युत्तर
नव्वदच्या दशकातील ‘हे’ पाच क्रिकेटर टी२० खेळले असते तर गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं असतं