यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. काल (16 फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांमध्ये आगामी हंगामाबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पहिला सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात होईल.
आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये अनेक वेळा चुरशीच्या लढत झाल्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा खूप मजबूत आहे. यामुळे, चाहत्यांना पहिल्याच सामन्यात उत्साहासहित गरमा-गरमीचे वातावरण पाहण्याची संधी मिळू शकते.
तत्पूर्वी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाने आयपीएलचा सलामीचा सामना खेळावा असे अनेक वेळा वाटत असेल, दरम्यान अनेक संघांना ही संधी देखील मिळाली आहे. तथापि, लीगच्या 17 वर्षांच्या इतिहासात अजूनही काही संघ आहेत ज्यांना हंगामाचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. चला तर मग ते 2 संघ कोणते याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) राजस्थान रॉयल्स- आयपीएलच्या पहिल्या हंगामात चॅम्पियन बनलेल्या राजस्थान रॉयल्सला (RR) आतापर्यंत एकदाही हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2008 मध्ये चॅम्पियन असूनही, राजस्थानला आगामी हंगामातील पहिल्या सामन्यासाठी स्थान दिलं नाही. अशा परिस्थितीत, या संघाची सुरुवातीची लढत खेळण्याची प्रतीक्षा कधी संपते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
2) पंजाब किंग्ज- पंजाब किंग्जचा (PBKS) संघ पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. पूर्वी संघाचे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब होते पण काही हंगामांनंतर ते बदलून पंजाब किंग्ज करण्यात आले. पण यामुळे पंजाबचे नशीब बदलले नाही. त्यांना एकदाही जेतेपद जिंकण्या यश आले नाही. जेतेपद जिंकण्यात अपयशी ठरलेल्या या संघाला कोणत्याही हंगामात सुरुवातीचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
???????????? ???????????????????????? ???????????????????????????? ???????????????????????????? ???????????? ????????????????????! ????️✨
As we gear up for IPL 2025, three-time champions KKR will take on three-time finalists RCB in the season opener at Eden Gardens! ????#IPL2025 #India #BCCI #T20s #ipl2025schedule #IndianCricketTeam #Cricket pic.twitter.com/eBFT6D241D
— Anik Das ???????? (@AnikDas_7) February 17, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; तिकिटे कधी आणि कशी खरेदी करता येतील? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
IPL 2025; हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सची धुरा कोण सांभाळणार?
भारतीय संघासाठी दुबईत खास खेळपट्टी तयार ! फलंदाजांचा जलवा की गोलंदाजांचा कहर?






