इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलाव सोहळ्यात वेस्ट इंडीज संघाचा विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरचा देखील समावेश होता.
शिमरॉन हेटमायरने गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाकडून खेळताना अनेकदा महत्वाच्या खेळ्या देखील केल्या होत्या. परंतु आगामी हंगामासाठी त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केले होते. आता येत्या आयपीएल २०२२ स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला ८ कोटी ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
शिमरॉन हेटमायरला आपल्या संघात स्थान देण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये या लिलाव सोहळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु शेवटी राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आणि त्याला ८ कोटी ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.
महत्वाच्या बातम्या :
‘किंग खान’च्या अनुपस्थितीत मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाची लिलावाला हजेरी, फोटो तुफान व्हायरल