भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसनची (Sanju Samson) गणना अशा भारतीय फलंदाजांमध्ये केली जाते, ज्याचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची उत्कृष्ट खेळण्याची शैली. आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सॅमसन सर्वत्र वेगवान धावा करताना दिसतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 14व्या स्थानी आहे.
संजू सॅमसनने 2013 मध्ये पंजाब किंग्ज कडून खेळताना त्याच्या आयपीएल कारकीर्दीला सुरुवात केली होती. आता संजू सॅमसन (Sanju Samson) गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान फ्रँचायझीचा एक भाग आहे. सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या 167 सामन्यांमध्ये 30.69च्या सरासरीने फलंदाजी करत 4,419 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 3 शतकांसह 25 अर्धशतके झळकावली आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण सॅमसनने आयपीएलच्या कोणत्या 3 हंगामात सर्वाधिक धावा केल्या, हे जाणून घेऊया.
1) आयपीएल 2024- आपल्या आयपीएल कारकिर्दीत संजू सॅमसनने (Sanju Samson) 2024च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 15 सामन्यात 48.27च्या सरासरीसह 153 पेक्ष्या जास्त स्ट्राइक रेटने 531 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत. तर 86 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. संजू सॅमसन शेवटच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानी होता.
2) आयपीएल 2021- संजू सॅमसन (Sanju Samson) आयपीएलच्या 14व्या हंगामात कर्णधार म्हणून अपयशी ठरला असेल, परंतु फलंदाज म्हणून त्याची कामगिरी खूपच चांगली होती. त्याने 14 सामन्यांमध्ये 40.33च्या सरासरीने 484 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 शतक, 2 अर्धशतके झळकावली.
3) आयपीएल 2022- आयपीएलच्या 15व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता आणि त्यामध्ये संजू सॅमसनची (Sanju Samson) महत्त्वाची भूमिका होती. सॅमसनने 17 सामन्यात 28.63च्या सरासरीने 458 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 146च्या वर होता. आयपीएल 2022 मध्ये त्याने 2 अर्धशतके झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय सचिवपदी देवजीत सैकिया यांची निवड! जय शाहांची जागा घेणार
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले मोठे अपडेट
ENG vs NZ; जो रूटने झळकावले 36 वे कसोटी शतक! ‘या’ दिग्गजाची केली बरोबरी





