---Advertisement---

‘ऐतिहासिक’ कामगिरीनंतर चहलला‌ सॅमसनने दिली नवी उपाधी, इतरांनाही केली विनंती

On: शुक्रवार, मे 12, 2023 1:26 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा आयपीएल 2023 चा 56 वा सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयासह राजस्थानने हंगामातील सहावा विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले. या सामन्यात राजस्थान संघाचा दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याने खास विक्रम नावावर केला. या सामन्यात चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज बनला. त्याच्या या कामगिरीबद्दल विचारल्यानंतर संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने कौतुक केले.

या सामन्याआधी चहल ड्वेन ब्राव्होसह सर्वाधिक बळी मिळवण्याच्या बाबतीत संयुक्तरित्या अव्वलस्थानी होता. या सामन्यात त्याने नितिश राणाच्या रूपाने आपला पहिला बळी मिळवत पहिले स्थान काबीज केले. त्यांनी या संपूर्ण सामन्यात 25 धावा देत चार महत्त्वपूर्ण बळी मिळवत केकेआरचा डाव 149 पर्यंत मर्यादित राखण्यात सिंहाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर बोलताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला चहलच्या या विक्रमाविषयी विचारले असता तो म्हणाला,

“मला असे वाटते की आता त्याला दिग्गज अशी पदवी देऊन टाकावी. अनेक वर्षांपासून तू अशी कामगिरी करतोय. आम्ही खूप नशीबवान आहोत तो आमच्या संघात आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही. ‌चेंडू दिला की तो आपली कामगिरी फत्ते करतो. त्याचा हा विक्रम पाहून नक्कीच आनंद होत आहे.”

राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला यजमान कोलकाता नाईट रायडर्स संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 149 धावा करू शकला. विजयासाठी राजस्थानला 150 धावांचे आव्हान मिळाले होते, जे त्यांनी अवघ्या 13.1 षटकात गाठले. जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या, तर सॅमसनने 29 चेंडूत नाबाद 48 धावा चोपल्या. या विजयामुळे राजस्थानने आपले आव्हान कायम राखले आहे.

(Rajasthan Royals Captain Sanju Samson Said Yuzvendra Chahal Is Legend Now)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंच्या आंदोलनाची धग बीसीसीआयपर्यंत! ‘या’ प्रकरणात मिळाली नोटीस, वाचा सविस्तर 
धोनी-रैनाच्या विक्रमाचा पाठलाग करतोय यशस्वी! केकेआरला चोपत जडेजाला सोडले मागे 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---