रविवारी (१५ मे) आयपीएल २०२२मध्ये डबल हेडर खेळला गेला. या डबल हेडरमधील दुसरा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना उभय संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. राजस्थानने या सामन्यात लखनऊला २४ धावांनी पराभूत केले. राजस्थानचा हा हंगामातील आठवा विजय होता. यासह त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावत १५४ धावाच करता आल्या.
राजस्थानच्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आले. लखनऊकडून एकट्या दिपक हुडाने चांगली खेळी केली. त्याने ३९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. कृणाल पंड्याने २५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिस २७ धावा करून बाद झाला. तर कर्णधार केएल राहुलची १० धावांवर विकेट पडली. इतर फलंदाजांना साध्या दुहेरी धावाही करता आल्या नाहीत.
A double-wicket over! 👌 👌
Obed McCoy dismisses Jason Holder and Dushmantha Chameera. 👍 👍#LSG 120/7.
Follow the match 👉 https://t.co/9jNdVD6NoB#TATAIPL | #LSGvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/EikzpXOtPG
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
या डावात राजस्थानकडून त्यांच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेय मॅककॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच युझवेंद्र चहल आणि आर अश्विन यांच्या हातीही एक-एक विकेट लागल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४१ धावा केल्या. २९ चेंडू खेळताना १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने १७८ धावा केल्या. जयस्वालबरोबरच देवदत्त पडीक्कलने ३९ धावा जोडल्या. तसेच संजू सॅमसननेही ३२ धावांचे योगदान दिले. रियान पराग (१९ धावा), जिम्मी नीशम (१४ धावा), ट्रेंट बोल्ट (१७ धावा) आणि आर अश्विन (१० धावा) यांच्या खेळीही संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरल्या.
लखनऊच्या गोलंदाजांना या डावात ६ विकेट्स घेण्यात यश आले. रवी बिश्नोईने २, आवेश खान, जेसन होल्डर, आयुष बदोनी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! तब्बल १४०० किमी अंतर कापून धोनीला पाहायला आला होता चाहता, पण झाली निराशा
कौतुकास पात्र मथीशा पथीराणाची खुद्द कर्णधार एमएस धोनीकडून स्तुती; म्हणाला, ‘तो दुसरा मलिंगाच’
अभिराम निलाखे, ईशान दिगंबर, सिद्धी खोत, श्रावणी देशमुख यांचा मुख्य फेरीत प्रवेश